कोरोना काळात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कोरोना काळात नागझरी, जेवळी, रायवाडी, हरंगुळ (खु.) येथे बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे पेरणीचे प्रशिक्षण, बीजोत्पादन, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, शेततळे, खत वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले. तसेच जनजागृतीही करण्यात आली असल्याचे कृषी सहायक सूर्यकांत लोखंडे यांनी सांगितले. मागील वर्षी ४१५ एकरवर बीबीएफ पेरणीचा प्रयोग होता. यावर्षी त्यामध्ये वाढ झाली असून, एक हजार एकरवर पेरणीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन शेतात बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी केली. त्यामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला. तसेच एकरी १४ क्विंटल सोयाबीनचा उतारा मिळाला. बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून, यावर्षी अधिक क्षेत्रावर बीबीएफ पेरणी करणार असल्याचे रायवाडी येथील कृष्णाथ बर्दापुरे आणि नागझरी येथील बाळासाहेब पवार यांनी सांगितले.