शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मजूर आईच्या पोरानं जिममध्ये काम करत गाठले ध्येय; खेलो इंडियात आकाश गौंडची सुवर्ण किमया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 18:04 IST

जबरदस्त लिफ्टिंग व स्ट्राँग स्नॅच मारत विरोधी खेळाडूपेक्षा अधिक भार उचलत त्याने ही किमया केली आहे.

- महेश पाळणेलातूर : घरची परिस्थिती साधारण. आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविते. आकाशही दोन सत्रात जीममध्ये काम करून तिला हातभार लावतो. अशा खडतर परिस्थितीत लातूरच्या आकाश श्रीनिवास गौंड याने वेटलिफ्टिंग खेळात वजनदार कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठात सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मंगळवारी सुवर्णपदक पटकावित आकाश ठेंगणे केले आहे.

शहरातील दयानंद कला महाविद्यालयात एम. ए. प्रथम वर्षात शिकणाऱ्या आकाश गौंडने नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत वेटलिफ्टिंग खेळात ५५ किलो वजनी गटात सुवर्ण किमया साधली आहे. जबरदस्त लिफ्टिंग व स्ट्राँग स्नॅच मारत विरोधी खेळाडूपेक्षा अधिक भार उचलत त्याने ही किमया केली आहे. स्नॅचमध्ये १०३ किलो तर क्लीन ॲण्ड जर्कमध्ये १२५ असे एकूण २२८ किलो वजन उचलत त्याने हे सुवर्णपदक पटकाविले आहे. त्यास प्रशिक्षक नीलेश जाधव, शुभम तोडकर, एनआयएस कोच परमज्योतसिंग सिद्धू, क्रीडा विभागप्रमुख प्रा. अशोक वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, विद्यापीठाचे क्रीडा संचालक विठ्ठलसिंह परिहार, प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड यांनी त्याचे कौतुक केले.

अखिल भारतीय स्पर्धेतही होते गोल्ड...चंदीगड येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत २३४ किलो वजन उचलत त्याने काही दिवसांपूर्वीच सुवर्णपदक पटकाविले होते. यासह पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकाविले होते. संघटनेमार्फत आयोजित खुल्या गटातही त्याने कांस्यपदक मिळविले आहे. घरची परिस्थिती साधारण असल्याने खुराकचा खर्च तो आपल्याच महाविद्यालयात असलेल्या जीमच्या पगारातून भागवत असतो. दयानंद शिक्षण संस्थाही त्याला खेळासाठी वेळोवेळी मदत करते.

आर्थिक प्रश्न सोडविला...घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आकाशला नेहमीच आर्थिक चणचण भासते. आई सरकारी दवाखान्यात कंत्राटी पद्धतीवर सिस्टर म्हणून नोकरीला होत्या. मात्र सध्या त्या मजुरी करून घरचा उदरनिर्वाह भागवितात. जीम ट्रेनर म्हणून मिळालेल्या पैशातून आकाश हातभार लावतो. खेलो इंडिया स्पर्धेला जाण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. उसनवारी करीत त्याने आपली खेळाची हौस भागवत हे यश मिळविले.

सलग दुसरे सुवर्णपदक मिळविल्याचा आनंद...चंदीगड येथे झालेल्या अखिल भारतीय स्पर्धेत विद्यापीठाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. आता खेलो इंडिया स्पर्धेतही सुवर्णपदक मिळाले. त्यामुळे सलग दुसरे सुवर्णपदक मिळविल्याचा आनंद आहे. भविष्यात वेटलिफ्टिंग या खेळात लातूरचे नाव आणखीन उज्ज्वल करणार असल्याचे आकाशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :laturलातूरKhelo Indiaखेलो इंडिया