शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सासरवाडीला निघालेला जावई अपघातामध्ये ठार, लेकराला पाहण्यापूर्वीच काळाने गाठलं

By राजकुमार जोंधळे | Updated: January 25, 2026 05:46 IST

Latur Accident News: ज्या घरात चार दिवसांपूर्वीच पाळणा हलला, तिथे आज सुतकाचे सावट पसरले आहे. आपल्या पहिल्याच ‘पुत्ररत्नाचे’ तोंड पाहण्यासाठी आनंदाने सासुरवाडीला निघालेल्या एका २२ वर्षीय तरुण बापाचा वाटेतच काळाने घास घेतला.

- राजकुमार जाेंधळे

 लातूर - ज्या घरात चार दिवसांपूर्वीच पाळणा हलला, तिथे आज सुतकाचे सावट पसरले आहे. आपल्या पहिल्याच ‘पुत्ररत्नाचे’ तोंड पाहण्यासाठी आनंदाने सासुरवाडीला निघालेल्या एका २२ वर्षीय तरुण बापाचा वाटेतच काळाने घास घेतला. निलंगा-उदगीर राज्य मार्गावरील हंचनाळ पाटीनजीक झालेल्या भीषण अपघातात हा तरुण जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील होनमाळ येथील रहिवासी खाजा मेहनोदीन इस्माईल शेख (वय २२) याला चार दिवसांपूर्वीच पुत्ररत्न प्राप्त झाले होते. बाळ आणि बाळंतीण पत्नी सध्या उदगीर तालुक्यातील तोगरी येथे सासुरवाडीला होते. आपल्या चिमकुल्याला पहिल्यांदा कडेवर घेण्यासाठी खाजा शेख हे आपल्या दुचाकीवरून (एम.एच. २४ डब्ल्यू. ७१७९) तोगरीकडे निघाले होते. मात्र, हंचनाळ शिवारात नियतीने त्याच्यावर घाला घातला.

पुलाच्या बाेर्डाला दुचाकी धडकलीनिलंगा-उदगीर रस्त्यावर हंचनाळ पाटीनजीक एका पुलाचे काम अनेक दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. या ठिकाणी वळण रस्ता अथवा वाहनधारकांसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा सुविधांचा (बॅरिकेड्स किंवा रिफ्लेक्टर्स) अभाव असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने खाजा यांची दुचाकी पुलाच्या बोर्डाला जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, खाजा यांचा जागीच मृत्यू झाला.

होनमाळ गावावर शोककळाअवघ्या २२ वर्षांच्या तरुणाचा असा अकाली मृत्यू झाल्याने होनमाळ गावावर शोककळा पसरली आहे. आपल्या पित्याला कधीच न पाहिलेल्या त्या चिमकुल्याचा आणि त्याच्या आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. घटनेची माहिती मिळताच देवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Groom Dies in Accident En Route to See Newborn Son

Web Summary : A 22-year-old man died in an accident near Hanchal while going to his wife's home to see his newborn son. The accident occurred due to poor road conditions near a bridge construction site. The village mourns the young father's untimely death.
टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर