शेल्हाळ येथील विद्वान कल्याणे व हणमंत कल्याणे हे कुलर कंपनीत काम करीत असताना बुधवारी दुपारी २ वा. सुमारास त्यांच्या कंपनीमध्ये साप दिसला. परंतु, साहित्य जास्त असल्याने व सापाची छोटीशी बाजू दिसत असल्याने त्यांनी सापाला पकडण्यासाठी सर्पमित्र श्याम पिंपरे यांना बोलाविले. त्यांनी येऊन हळुवारपणे बाजूचे साहित्य काढून नागाची शेपटी पकडली. बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु नाग बाहेर निघत नव्हता. सुरुवातीस उंदीर वगैरे असा छोटा प्राणी नागाने गिळला असेल म्हणून सर्पमित्राने जोर लावून ओढले. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. नागाच्या तोंडात दुसऱ्या सापाची शेपटी दिसली. सर्पमित्राने त्या दोन्ही सापाला वेगळे केले असता दुसरा साप परड जातीचा विषारी साप असल्याचे लक्षात आले. हे दोन्ही साप वेगळे केले असता परड हा नागाच्या विषारी चाव्यामुळे मृत पावला होता. यावेळी नागरिकांची गर्दी झाली होती. सर्पमित्र शाम पिंपरे यांनी नागाला धरून नंतर जंगलात सोडून दिले.
नागाने गिळले विषारी परडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST