शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवर मागणी करा, बॉटल हातात मिळवा; गोवा बनावटीच्या दारुची लातूर शहरामध्ये तस्करी

By राजकुमार जोंधळे | Updated: September 1, 2022 17:27 IST

पोलिसांच्या कार्यावाईत दुचाकीसह एकास अटक तर दुसरा निसटला

लातूर : गोवा बनावटीच्या दारुची लातूर शहरासह जिल्ह्यात चोरट्या मार्गाने वाहतूक करून विक्री करणाऱ्या निलंगा येथील तरुणाला पाठलाग करुन नाना-नानी पार्क परिसरात गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. तर दुसरा साथीदार पथकाच्या तावडीतून निसटला आहे. दरम्यान, त्याच्याकडून अवैध दारुसह एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लातूर येथील पथकाला लातूर शहरासह जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारुची चोरट्या मार्गाने तस्करी केली जात असल्याची खबऱ्याकडून माहीती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा लावला. खबऱ्याने दिलेल्या 'टीप'नुसार एक दुचाकी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाना - नानी पार्क दरम्यानच्या मार्गावर जात असल्याचे आढळून आले. यावेळी पथकाने दुचाकीचा (एम.एच. २४ ए.एल. ११३६ ) पाठलाग केला. नाना-नानी पार्कनजीक शिवाजी कुमार कांबळे (वय २७ रा. निलंगा) याला अटक  करण्यात आली. तर सोबतचा साथीदार हा पथकाला गुंगारा देत पळून गेला. अटकेत असलेल्याकडून गोवा बनवटीची ५४ लिटर दारू (किंमत ७९ हजार ९२० रुपये ) आणि दुचाकी वाहन जप्त करण्यात आले. याबाबत शिवाजी कुमार कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अभिजित देशमुख, दुययम निरीक्षक आर. एम. बांगर, एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, स्वप्नील काळे, दिनेश सूर्यवंशी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान अनिरुद्ध देशपांडे, हनुमंत मुंडे, संतोष केंद्रे, सुरेश काळे यांच्या पथकाने गुरुवारी केली.

अन दारुसाठी 'मोबाइल' सेवा...कोणत्याही कंपनीची आणि हातभट्टीसह देशी दारुची मागणी करण्यासाठी केवळ एक कॉल करा दारु तस्करी करणाऱ्या व्यक्तीला...मग दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही ज्या ठिकाणी थांबला आहात त्या ठिकाणी हे पार्सल आणून दिले जाते. गोवा बनवटीसह देशी दारूला मोठी मागणी असल्याचे समोर आता आले आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी