शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बसविली मूत्राशयाची नळी

By हरी मोकाशे | Updated: April 30, 2023 19:09 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदाच शस्त्रक्रिया.

हरी मोकाशे, लातूर : एका ५६ वर्षीय पुरुष रुग्णाची मूत्राशयाची नळी दीर्घ रोगामुळे पूर्णपणे खराब होऊन बंद पडली होती. तेव्हा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी ही नळी तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बनविण्याचा निर्णय घेत पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया शनिवारी केली आहे.

बीड येथील एका ५६ वर्षीय पुरुषाची मूत्राशयाची नळी बीएक्सओ (बलनायटिस झिरोटिका ऑब्लिटरनेस) या दीर्घरीत्या झालेल्या रोगामुळे पूर्णपणे खराब होऊन बंद पडली होती. त्यांना गावाकडील खासगी रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात मूत्राशयाच्या पिशवीत पाइप टाकून लघुशंकेचा मार्ग मोकळा करून देत लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे हा रुग्ण येथे दाखल झाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शल्यचिकित्सा विभागातील तज्ज्ञ डॉ. कासिम अत्तार यांनी रुग्णाचा इतिहास जाणून आवश्यक त्या तपासण्या करून घेण्यास सांगितले. तेव्हा मूत्राशयाची संपूर्ण निकामी असल्याचे आढळले. त्याची माहिती नातेवाईकांना देऊन गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याचे सांगितले. तसेच रुग्णाची मूत्राशयाची संपूर्ण नळीच नवीन स्वरूपात तोंडातील त्वचा काढून कृत्रिमरीत्या बनविण्यात येईल, असेही डॉ. कासिम अत्तार यांनी सांगितले. तेव्हा नातेवाईकांनी होकार दिल्यानंतर रुग्णाच्या तोंडातील त्वचा काढून घेऊन मूत्राशयाची नवीन कृत्रिम नळी बनवून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली.

शस्त्रक्रियेसाठी यांनी केली मदत...

या शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गंगाधर अनमोड, पथकप्रमुख डॉ. गणेश स्वामी, डॉ. शोभा निसाले, डॉ. पुष्कराज बिराजदार, डॉ. चंद्रशेखर हळणीकर, डॉ. ज्ञानेश्वर पांचाळ, डॉ. संदीप जाधव, डॉ. निखिल काळे, डॉ. नितीन बरडे, भूलतज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र चौहान, डॉ. किरण तोडकरी, डॉ. जोशी यांचे सहकार्य लाभले. त्यांना परिचारिका गोडबोले, समाजसेवा अधीक्षक सुरेंद्र सूर्यवंशी आदींनी मदत केली. ही शस्त्रक्रिया महात्मा जाेतिबा फुले जनआरोग्य योजनेचे अध्यक्ष तथा वैद्यकीय समन्वयक डॉ. मेघराज चावडा यांच्या अधिपत्याखाली मोफत झाली.

अवघड जागेस दुखापत झाल्यास तत्काळ उपचार घ्या...

लघुशंकेच्या अवघड जागेवर दीर्घकाळ इन्फेक्शन, मार लागून दीर्घकाळ दुखापत राहिल्यास अथवा इतर रोगांमुळे मूत्राशयाची पूर्ण नळीच खराब होऊन लघवी बंद होऊ शकते. त्यामुळे तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्वरित उपचार घ्यावेत. - डॉ. कासिम अत्तार, युरो सर्जन.

अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे मोफत...

अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. किडनी, प्रोस्टेटच्या शस्त्रक्रिया, मूत्राशयाच्या पिशवीच्या समस्या व शस्त्रक्रिया अशा प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया येथे मोफत यशस्वीपणे पार पाडल्या जातात. या सोयी- सुविधांचा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेचा लाभ जिल्ह्यातील परिसरातील रुग्णांना होईल. - डॉ. समीर जोशी, अधिष्ठाता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल