- राजकुमार जाेंधळे
लातूर - शहरासह जिल्ह्यातील वेगवगेळ्या पाेलिस ठाण्यामध्ये, शाखेत कार्यरत असलेल्या एकूण सहा पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी मंगळवारी जारी केले आहेत. यामध्ये एमआयडीसी येथील पदभार एएचटीयू विभागाचे पाेलिस निरीक्षक समाधान किशनराव चवरे यांच्याकडे देण्यात आला आहे. तर एमआयडीसीचे पाेलिस निरीक्षक सुधाकर देडे यांची पाेलिस नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पाेलिस निरीक्षक सुनिल पांडुरंग गायकवाड यांची किनगाव पाेलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. लातुरातील गांधी चाैक पाेलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पाेलिस निरीक्षक सदानंद गाेविंदराव भुजबळ यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली केली आहे. औसा पाेलिस ठाण्यातील सहायक पाेलिस निरीक्षक प्रमाेद माेहनराव बाेंडले यांची पाेलिस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेत बदली करण्यात आली आहे. लातुरातील एमआयडीसी पाेलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पाेलिस उपनिरीक्षक सीमा गणपती बेद्रे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करत रेणापूर ठाण्यातील पाेलिस उपनिरीक्षक मुख्तार ईब्राहिम शेख यांची बी.डी.डी.एस. शाखेत बदली करण्यात आली आहे. बदली आदेश प्राप्त हाेताच नवीन नेमुकीच्या, बदलीच्या ठिकाणी तातडीने हजर हाेऊन कार्यभार स्विकारावा, असे आदेशात म्हटले आहे.