शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

साहेब, शाळेस नवीन इमारत कधी होणार? ग्राम दरबारात गावकऱ्यांनी मांडल्या अडीअडचणी

By हरी मोकाशे | Updated: February 28, 2025 19:42 IST

गावकऱ्यांनी शाळेची समस्या मांडल्यानंतर बीडीओ तुकाराम भालके यांनी शाळेची पाहणी केली.

लातूर : दर्जेदार शिक्षण मिळते म्हणून आम्ही आमच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवितो. पण, शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत गळती लागले. साहेब, आमच्या गावच्या शाळेची नवीन इमारत कधी होणार? असा सवालवजा विनवणी तालुक्यातील जेवळी येथील नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी केली.

शासन योजना, सेवा ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर मिळाव्यात विभागीय आयुक्तांनी एक दिवस गावकऱ्यांसाेबत (ग्राम दरबार) उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी जेवळी गावास भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधत विविध योजनांची माहिती दिली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी एम.डी. मुक्तापुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.एच. पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी जे.डी. माळी, विस्तार अधिकारी सिध्देश्वर नल्ले, ग्रामसेविका शिल्पा किनीकर, बाबूराव करमले, निखिलेश पाटील, पद्माकर होळकर, धनंजय वैद्य, अनिल कुंभारे आदी उपस्थित होते.

अंगणवाडीमार्फत पाककृती...गरोदर माता व बालकांच्या विकासासाठी अंगणवाडीमार्फत पाककृतीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पशुसंवर्धन शिबीराबराेबर आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. शासन योजनांची माहिती देण्यात आली.

प्रस्ताव तयार करावा...गावकऱ्यांनी शाळेची समस्या मांडल्यानंतर बीडीओ तुकाराम भालके यांनी शाळेची पाहणी केली. शाखा अभियंता पाटील यांना प्रस्ताव तयार करुन वरिष्ठांकडे पाठविण्याच्या सूचना केल्या.

गावकऱ्यांशी थेट संवादएक दिवस गावकऱ्यांसोबत उपक्रमामुळे गावकऱ्यांशी थेट संवाद होत आहे. नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यात येणार आहेत.- तुकाराम भालके, गटविकास अधिकारी.

टॅग्स :laturलातूरzp schoolजिल्हा परिषद शाळा