शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नाना- नानी पार्क येथे अबालवृध्द येतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या वेळी येथे गर्दी पहावयास मिळते. गावभागातील नागरिक येथे फिरण्यासाठी तसेच व्यायामासाठी येतात. मात्र, येथील तलाव परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तलावात बेशरमाची झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. तसेच तलावात अनेक वर्षांपासून असलेले कारंजे बंद असून तसेच इतर लोखंडी भंगार पडून आहे. वादळामुळे कोसळलेल्या, वाळलेल्या झाडांच्या फांद्या पडून आहेत. तसेच पार्कमध्ये आलेल्या काही जणांनी पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, इतर कचरा टाकल्यामुळे तलावाच्या सौंदर्याची, निसर्गाची हानी होत आहे. त्यामुळे पाण्यास दुर्गंधी सुटत असल्याने तलावातील मासे, पक्षी, वाॅकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. वाॅकिंग ट्रॅकचीही वेळेवर स्वच्छता केली जात नाही, असे ग्राहक पंचायतचे विभाग संघटक प्रा. हेमंत वडणे असे जिल्हाधिकारी व महापालिकेस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नाना- नानी पार्कच्या तलावात वाढली झाडेझुडपे, कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST