शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पेठ शिवारात बालकाचा अर्धवट पुरलेला मृतदेह आढळला, ओळख पटविणे सुरू

By राजकुमार जोंधळे | Updated: January 19, 2024 18:46 IST

मृताची ओळख पटविण्यासाठीचे प्रयत्न; पोलिसांकडून महामार्गावरील सीसीटीव्हीची तपासणी

लातूर : शहरानजीक असलेल्या पेठ गावच्या शिवारात एका सातवर्षीय अनोळखी मुलाचा अर्धवट अवस्थेत पुरलेला मृतदेह आढळला. याबाबत सध्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या मात-पित्यासह आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. शिवाय, इतर स्थानिक पोलिसांकडूनही तपास केला जात आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील टोल नाके, हॉटेल्सवर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. 

पोलिसांनी सांगितले, पेठ शिवारात लहान अनोळखी मुलाचा मृतदेह परवा आढळून आला होता. दरम्यान, लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. आता याच प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. यासाठी स्थानिक पोलिसांसह इतर तीन पथकांची जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी नियुक्ती केली आहे. या पथकाला तपासाच्या अनुषंगाने सुचना केल्या आहेत. या बालकाचा कोणी, कोणत्या कारणासाठी खून केला आहे का? त्या बाजूनेही तपास केला जात आहे. शिवाय, लातूरसह इतर जिल्ह्यातील कोणी मुले मिसिंग आहेत का? याचाही कसून शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर माता-पिता आणि नातेवाईकांचाही शोध घेतला जात आहे. 

तीन दिवसांपासून ओळख पटविण्यासाठीचे प्रयत्नपेठ शिवारात अर्धवट अवस्थेत पुरलेल्या मुलाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे तीन दिवस झाले प्रयत्न सुरु आहेत. यासाठी विविध पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला आहे. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी; आरोपीचा पोलिसांकडून माग...या बालकाचा खून करण्यात आला असावा, त्यानुसार पोलिस आरोपींचा मग काढत आहेत. शिवाय, मृत मुलाच्या माता-पित्याचाही शोध घेतला जात आहे. यातील कोणाचाही धागा हाती लागला तरमृतदेह आणि गुन्ह्याचा उलगडा होणार आहे. सध्या वेगवेगळ्या दिशेने पोलिस तपास करत आहेत. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील विविध टोल नाके, ढाबे, हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे तपाससले जात आहेत. यातून काहीतरी लवकरच हाती लागेल. - सोमय मुंडे, पोलिस अधीक्षक, लातूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर