शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! उदगीरमध्ये तीन दिवसांत अचानक ४१ कावळ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:58 IST

उपाययोजनांसाठी शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली असून मृत कावळ्यांची नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत

लातूर : दोन दिवसांपासून उदगिरात अचानकपणे कावळे दगावल्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी आणखीन ५ कावळे मृतावस्थेत आढळले. त्याची तातडीने दखल घेत मृत कावळ्यांचे वैद्यकीय नमुने औंध येथील राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. अहवालानंतर पुढील आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, उपाययोजनेसाठी जिल्हास्तरावर शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे.

उदगिरातील महात्मा गांधी उद्यान व हुतात्मा स्मारक नगर परिषद वाचनालय परिसरात १३ जानेवारी रोजी २८ कावळे मृतावस्थेत आढळले. सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. पांडे यांनी तात्काळ मृत कावळ्यांचे वैद्यकीय नमुने राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. दरम्यान, १४ रोजी ८, तर बुधवारी आणखीन ५ कावळे मृतावस्थेत आढळले. त्यामुळे एकूण मृत कावळ्यांची संख्या ४१ झाली आहे. मयत कावळ्यांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळेचे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. मनोज घाटे, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. एस. आर. साळवे यांच्या पथकाने बुधवारी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच उदगीर तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या. रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी पीपीई किट्स, ग्लोव्हज, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वितऔंधच्या प्रयोगशाळेतून नमुना निदान अहवाल प्राप्त झाल्यानंतर उपाययोजना करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात इतरत्र पशु -पक्ष्यांत कोणत्याही प्रकारची अनपेक्षित मृत्यूची घटना आढळल्यास नागरिकांनी त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना प्रमुखांशी संपर्क साधावा. अफवांवर विश्वास ठेवू नये.- डॉ. श्रीधर शिंदे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन.

टॅग्स :laturलातूरNatureनिसर्ग