अहमदपूर : तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक तालुका शिवनेरी संपर्क कार्यालयात घेण्यात आली. यावेळी नूतन शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीला तालुकाप्रमुख विलास पवार पाटील, विधानसभा संघटक, पंचायत समिती सदस्य विलास पवार, शहरप्रमुख तथा बाजार समितीचे संचालक भारत सांगवीकर, नगरसेवक संदीप चौधरी, उपतालुका प्रमुख अनिल लामतुरे, गणेश पांचाळ, लहू बारवाड, प्रमोद गोरटे, तिरुपती पाटील, दत्ता हेंगणे, गणेश माने, लक्ष्मण महाराज अलगुले, सरपंच राम माळी, युवा सेना तालुकाप्रमुख रामप्रसाद अय्या, बाजार समितीचे संचालक माऊली देवकते, संजय बुरुसापटे, सुभाष गुंदिळे, आदी उपस्थित होते. यावेळी रेड्डी यांनी आगामी काळात शिवसेनेचा अहमदपूर पॅटर्न निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले.