येथील राष्ट्रवादीच्या तालुका शाखा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, सक्षणा सलगर, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे, आ. बाबासाहेब पाटील, आशाताई भिसे, बसवराज पाटील नागराळकर, जयसिंगराव गायकवाड, डी.एन. शेळके, युवा प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, सूरज चव्हाण यांच्या मागणीवरुन घरणी व साकोळ मध्यम प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याचे दुरुस्ती तत्काळ सुरू करू. प्रास्ताविक सूरज चव्हाण, सूत्रसंचलन प्रा. महेताब शेख, माधव आवाळे यांनी केले. आभार तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजू बर्गे, अनिल देवगरे, नंदकुमार तांबोळकर, अब्दुलअजीज मुल्ला, पठाण फतेअली, ज्ञानोबा मोगले, गोविंद शेळगे, संदीप धुमाळे, शुभम ऐतनबोणे, एकनाथ पौळकर, ज्ञानोबा लोखंडे, मोहनराव भोसले, सरोजा गायकवाड, डॉ. सुनील हंगरगे, बबन होनमाने, खंडू पाटील आदींनी परिश्रम घेतले.
त्यासाठी नागरिकांनी निलंगा विधानसभेची धुरा सूरज चव्हाण यांच्यावर सोपविली तर विकासाची गती नक्कीच वाढेल असे प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केले.