शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शिरूर अनंतपाळात भरदिवसा धाडसी घरफोडी; कुलूप तोडून ३ लाख ३७ हजारचा ऐवज केला लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 19:10 IST

शिरूर अनंतपाळ  येथील भोजराजनगर भागातील राज्यमार्गालगत असलेल्या दत्ता देवशटवार यांच्या घराचे कुलूप तोडून भर दिवसा धाडसी चोरी करण्यात आली.  यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागीने तसेच रोख ३२ हजार असा ३ लाख ३७ हजार २०० रूपयाचा ऐवज लंपास केला.

लातूर : शिरूर अनंतपाळ  येथील भोजराजनगर भागातील राज्यमार्गालगत असलेल्या दत्ता देवशटवार यांच्या घराचे कुलूप तोडून भर दिवसा धाडसी चोरी करण्यात आली.  यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागीने तसेच रोख ३२ हजार असा ३ लाख ३७ हजार २०० रूपयाचा ऐवज लंपास केला.

शिरूर अनंतपाळ येथील किराणा मालाचे व्यापारी दत्ता देवशटवार हे शनिवारी आपल्या आईला उपचारासाठी लातूर येथील दवाखान्यात गेले होते . तर कुटुंबातील इतर सदस्य लग्न समारंभा निमित्त घराला कुलूप लावुन बाहेर गेले होते. हीच संधी साधत चोरट्यानी घरात घुसून दाराचे कुलूप तोडले आणि बेडरूम मध्ये असलेल्या कपाटातील सोन्याचे दागीने किमंत ३ लाख ५ हजार २०० रूपये तसेच रोख ३२ हजार असा एकंदर ३ लाख ३७ हजार २०० रूपयाचा ऐवज लंपास केला. 

याबाबत दत्ता देवशटवार यांचा मुलगा दिनेश देवशटवार यानी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . गुरन १९२ / २०१७ कलम ३८० ,४५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन ,अधिक तपास पोउपनि प्रदिप आलापुरकर करीत आहेत .दरम्यान घटनास्थळास उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक पोनि सुधाकर जगताप यानी भेट देऊन घटनेची पाहणी केली आहे .

श्वान पथकास पाचारण दरम्यान घटनेचा तात्काळ सुगावा लागावा यासाठी लातूर येथील श्वान पथकास बोलाविण्यात आले होते. परंतु श्वान घराच्या परिसरात घुटमळला आंणि गाडीत जाऊन बसला त्यामुळे चोरटे कोणत्या दिशेने गेले ते समजु शकले नाही .त्यामुळे दिवसा ढवळ्या घटना घडली असल्याने शहरासह तालुक्यात घबराहट पसरली आहे . 

ठसे घेण्यात आले श्वान पथकाकडून चोरट्याची दिशा निश्चितपणे समजली नसल्याने ठसा तज्ञाना बोलावुन कुलूप कोंडी तसेच घरातील ठसे घेण्यात आले आहेत .एकंदरच सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे

टॅग्स :laturलातूर