शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लातूर-बीडमध्ये 'शक्तिपीठ' आरेखन जैसे थे; शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष, मोजणीस कडाडून विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:49 IST

"आमची जमीन, आमचा आधार"; रेणापूर आणि अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो शेतकरी एकवटले, कायदेशीर लढाईची तयारी.

रेणापूर : बहुचर्चित आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'शक्तिपीठ महामार्गा'बाबत राज्य शासनाने १ एप्रिल २०२६ रोजी घेतलेला निर्णय लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला आहे. इतर जिल्ह्यांतील महामार्गाचे आरेखन बदलले असताना, लातूर आणि बीडमधील आरेखन मात्र 'जैसे थे' ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या अन्यायाविरोधात रेणापूर तालुक्यातील मोटेगाव फाटा येथे रविवारी दोन्ही जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली, ज्यामध्ये शासनाशी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आला.

गेल्या अडीच वर्षांपासून या महामार्गाला विरोध होत आहे. शासनाने अलीकडेच एक नवीन निर्णय पारित केला, ज्यानुसार काही जिल्ह्यांतील महामार्गाच्या नकाशात बदल करून दिलासा दिला आहे. मात्र, लातूर आणि बीड जिल्ह्यातील सुपीक जमिनीतूनच हा मार्ग जाणार असल्याने येथील शेतकऱ्यांनी सरकारचा दुजाभाव खपवून घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

बैठकीतील ५ महत्त्वाचे निर्णय..!मोटेगाव फाटा येथील बैठकीत शेतकरी कृती समितीने आक्रमक पावले उचलण्याचे ठरवले आहे. जोपर्यंत सुपीक भागातून जाणारा महामार्ग पूर्णतः रद्द होत नाही, तोपर्यंत लढा थांबणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शेतात पाऊल टाकू दिले जाणार नाही आणि 'संयुक्त मोजणी' प्रक्रियेला कडाडून विरोध केला जाईल. जिल्हा आणि तालुका पातळीवर मोठ्या ताकदीने आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले जाईल. समाजातील विविध घटक आणि राजकीय प्रतिनिधींच्या भेटी घेऊन होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली जाईल. रस्त्यावरील लढाईसोबतच कायदेशीर बाबी तपासून न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

...या गावातील शेतकरी एकवटलेया बैठकीला रेणापूर आणि अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ, भोकरंबा, मोटेगाव, चाडगाव, मोरवड, नांदगाव, भारज, गीत्ता यांसह अनेक बाधित गावांतील शेकडो शेतकरी उपस्थित होते. आमची सुपीक जमीन आमचा आधार आहे, ती कोणत्याही महामार्गासाठी बळी देऊ देणार नाही, असा एकमुखी सूर यावेळी उमटला.

मोटेगाव फाटा येथे झाली बैठकमोटेगाव झाटा येथे झालेल्या बैठकीला शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी कृती समितीचे समन्वयक गजेंद्र येळकर, बालाजी हाके, सुशील कुमार शिंदे, रामेश्वर चव्हाण, विठ्ठल नाना देशमुख यांच्यासह नीळकंठ भिसे, साहेबराव पाटील, दशरथ सोमवंशी, सुरज पाटील, दीपक माने, शैलेश खुरसाले, जयकिशन मेटे, बालाजी चव्हाण, परमेश्वर देशमुख, शिवराज पाटील आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers protest unchanged highway plan in Latur-Beed; opposition intensifies.

Web Summary : Latur and Beed farmers strongly oppose the 'Shaktipeeth' highway plan remaining unchanged. Despite changes elsewhere, the original plan persists, sparking farmer outrage and unified resistance against land surveys and government decisions.
टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गlaturलातूरFarmerशेतकरीBeedबीड