शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लातुरातील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील ६० फुटी रोडवरील सात दुकानांना भीषण आग

By हणमंत गायकवाड | Updated: February 23, 2024 22:23 IST

या दुकानांमध्ये गिफ्ट सेंटर, कुशनच्या दुकानांसह मोबाईल शॉपी, किराणा दुकानांचा समावेश आहे.

हणमंत गायकवाड, लातूर:  सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील साळे गल्ली भागातील ६० फुटी रोडवरील दुकानांना शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळातच आगीचा भडका उडाला. त्यामुळे या भागातील फर्निचरच्या तसेच गिफ्ट सेंटर अशा  एकूण सात दुकानांना आगीने वेढा दिला. या  आगित मोठे नुकसान झाले आहे.या दुकानांमध्ये गिफ्ट सेंटर, कुशनच्या दुकानांसह मोबाईल शॉपी, किराणा दुकानांचा समावेश आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तीन आगीच्या बंबसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग नियंत्रणात आणण्याचा अटोकाट प्रयत्न केला. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आग थोडी आटोक्यात आली.  रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. आगीचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस याचा तपास करीत आहेत. रात्री आग लागल्याने बचावकार्याला अडथळा येत होता.

मात्र, स्थानिक नागरिकांच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आटोक्यात आणली. सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या ६० फुटी रोडलगत बरीच दुकाने आहेत. या दुकानांपैकी गिफ्ट सेंटर, दोन कुशनची दुकाने, मोबाईल शॉपी, पान टपरीसह किराणा दुकानाला आगीने वेढले. त्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला असून, यात मोठी हानी झाली असल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी सुभाष कदम यांनी सांगितले.

टॅग्स :fireआग