शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेला ४० लाखांचा गुटखा चोरी प्रकरणात दोघे अटकेत; ३५ लाखांचा गुटखा अद्यापही गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 18:05 IST

एका धाडसत्रात जप्त करुन ठेवलेला तब्बल ८४ लाखांपैकी ४० लाखांच्या गुटख्याची चाेरी झाली होती

लातूर : पाेलिसांनी एका धाडसत्रात जप्त करुन ठेवलेला तब्बल ८४ लाखांपैकी ४० लाखांच्या गुटख्याची चाेरी झाल्याचे प्रकरण समाेर आले आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात जवळपास १३ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दाेघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून साडेचार लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. शनिवारी त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, २५ जानेवारीपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत १० ऑक्टाेबर २०२१ राेजी सहायक पाेलीस अधीक्षक अनिकेत कदम यांच्या पथकाने धाड टाकून तब्बल ८४ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला हाेता. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले हाेते. दरम्यान, एमआयडीसी पाेलीस ठाण्यातील अधिकारी, अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी गुरुवारी गाेदाम उघडले असता, जप्त केलेल्या मुद्देमालापैकी काही मुद्देमाल गायब असल्याचे आढळून आले. याची माेजदाद केली असता, जवळपास ४० लाखांचा गुटखा चाेरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

साडेचार लाखांचा गुटखा जप्त...धाडसत्रामध्ये जप्त करण्यात आलेल्या गुटख्यापैकी तब्बल ४० लाख १५ हजारांच्या गुटख्याची चाेरी करणाऱ्या एकूण १३ आराेपीपैकी अहमदपूर येथील एक आणि अन्य ठिकाणच्या एकाला पाेलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्यांच्याकडून केवळ साडेचार लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अद्यापही ३५ लाखांच्या गुटख्याचा सुगावा पाेलिसांना लागला नाही.

१३ जणांविराेधात गुन्हा दाखल...एमआयडीसी पाेलीस ठाण्यात राहुल कांबळे (रा. महादेवनगर, लातूर), इस्माईल कदम (रा. सिध्दार्थ साेसायटी, लातूर), समाधान कांबळे (रा. खाेरी गल्ली, लातूर), खमरउनिसा निळकंठे, नमा निळकंठे (रा. एमआयउीसी, लातूर), रंजना कांबळे (रा. महादेव नगर, लातूर), महेश बनसाेडे (रा. पंढरपूर जि. साेलापूर), किरण गाताडे (रा. महादेव नगर, लातूर), उमेश जाधव (रा. पंढरपूर, जि. साेलापूर), बाळकृष्ण गणे (रा. वसवाडी, लातूर), खादर शेख (रा. चाकूर) अजित घाेलप (रा. घाेलपवाडी, पुणे) आणि अहमदपूर येथील एक दुकानदार याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.   - संजिवन मिरकले, पाेलीस निरीक्षक, लातूर

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी