...
मार्गदर्शकपदी हसंराज भोसले यांची नियुक्ती
निलंगा : येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा. हंसराज भोसले यांची नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मराठी विषयाचे संशोधक प्राध्यापक म्हणून मान्यता दिली आहे. याबद्दल त्यांचे स्वागत महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील-निलंगेकर, प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपुके, उपप्राचार्य डॉ. सी. जे. कदम, प्रा. प्रशांत गायकवाड, संस्थेेचे समन्वयक दिलीपराव धुमाळ, प्राचार्य डॉ. भागवत पौळ, डॉ. बी. एस. गायकवाड, डॉ. बी. आर. गायकवाड, डॉ. अजित मुळजकर आदींनी केले.
...
विद्युत खांब झुकल्याने अपघाताची भीती
निलंगा : तालुक्यातील सावनगिरा व हंगरगा येथील विद्युत खांब झुकल्याने तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे. या परिसरातील विद्युत खांब झुकल्याने तारा ५ ते ६ फुटापर्यंत झुकल्या आहेत. यासंदर्भात महावितरणकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. महावितरणने याकडे लक्ष देऊन खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी विद्युत खांब व तारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
...