अध्यक्षस्थानी प्राचार्य वसंत कुलकर्णी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कमांडंट कमांडर बी.के. सिंह, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विलास शिंदे, विनायक करेवाड उपस्थित होते. पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, सी.व्ही. रमन यांनी रमन परिणाम याचा शोध लावल्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. २८ फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. कमांडंट कमांडर बी.के. सिंह म्हणाले, विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करावा. विज्ञानामुळे आज प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी विज्ञान या विषयाचा चांगला अभ्यास करावा. जिज्ञासू वृत्ती जोपासावी. प्रयोग करताना लक्ष द्यावे. सूत्रसंचालन विलास शिंदे यांनी केले. तर आभार विनायक करेवाड यांनी मानले.
यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.