शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या पाण्यासाठी मंत्रीपदाचा राजीनामा देईन - संभाजी पाटील निलंगेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 05:33 IST

गणेश विसर्जनाऐवजी लातूरमध्ये हजारो गणेश मूर्तींचे दान करण्यात आले़ पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़

लातूर : गणेश विसर्जनाऐवजी लातूरमध्ये हजारो गणेश मूर्तींचे दान करण्यात आले़ पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़ त्यामुळेच पुढच्या दोन वर्षांच्या काळात लातूरला उजनीचे पाणी देण्याची प्रक्रिया सुरू न झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन आणि पाण्यासाठी संघर्ष करेन, असा निर्धार पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा लातूर पॅटर्न राबविला गेला़ त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जिल्ह्यातील पाण्याच्या भीषण स्थितीचा मुद्दा समोर आला़ या संदर्भात पालकमंत्री निलंगेकर यांनी लातूर-निलंगा प्रवासात संवाद साधला. ते म्हणाले, वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यासह लातूर-उस्मानाबाद भागातील दुष्काळ कायमचा दूर केला जाईल़ या महत्त्वाकांक्षी योजनेत लातूर-उस्मानाबादचा समावेश करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली़दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मंजुरीही मिळाली आहे़ तसेच उजनीचेही पाणी लातूरला देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना ते म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत लातूरसाठी उजनीचे पाणी आणणारच़ पुढच्या दोन वर्षाच्या काळात याबाबत प्रक्रिया सुरू नाही झाल्यास मंत्रिपदाचाही त्याग करीऩ कुठलेही पद धारण न करता लातूरच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेन, हा माझा शब्द आहे़ आम्ही आज दुष्काळजन्य स्थिती अनुभवत आहोत़ पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला ही स्थिती येणार नाही, यासाठी आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल़ तेच मी करीत आहे़>१७१ सामंजस्य करारंउद्योगासाठी आवश्यक असलेले कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी नामांकित औद्योगिक समूहासोबत १७१ सामंजस्य करार करण्यात आले आहेत़ ज्याद्वारे सव्वा दोन लाखांवर युवकांना प्रशिक्षण मिळाले़ त्यातील १ लाख १८ हजार उमेदवारांना रोजगार आणि स्वयंरोजगार प्राप्त झाला़ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या अंतर्गत विविध योजनांमधून साडेनऊ कोटी रकमेचे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना केले आहे, असेही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Ujine Damउजनी धरण