शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पंप मालकाचे धाडस! १०० किमी पाठलाग करून टँकरमधून पेट्रोल चोरणारी टोळी पकडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:54 IST

टँकर चालक आणि पंप व्यवस्थापक या दोघांच्या संगनमताने सुरू होता गोरखधंदा

- महेबूब बक्षीऔसा (लातूर): मागील अनेक वर्षांपासून महामार्गावर खुलेआमपणे चालणाऱ्या पेट्रोल-डिझेल चोरीच्या गोरखधंद्याचा काल पर्दाफाश झाला आहे. मुखेड तालुक्यातील एका पेट्रोल पंप मालकाच्या पतीने तब्बल १०० किलोमीटर टँकरचा पाठलाग करून, येल्लोरी पाटीवर टँकरमधील पेट्रोल-डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या धाडसी कारवाईमुळे तेल तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सोलापूर येथील धर्मेंद्र ट्रान्स्पोर्टचा एक टँकर (क्रं. एम एच १३ सीयू २४३५) मुखेड तालुक्यातील मालक्ष्मी पेट्रोल पंपासाठी पेट्रोल घेऊन सोलापूरहून औसा मार्गे निघाला होता. टँकर चालक टवपिटू जगन्नाथ वर्मा आणि मुखेड येथील पंप व्यवस्थापक ज्ञानेश्वर मारोती नरवाडे यांनी संगनमत केले. टँकर चालक वर्मा आणि व्यवस्थापक नरवाडे यांनी विश्वासाने सोपवलेल्या टँकरमधील पेट्रोलची चोरी करण्यासाठी औसा येथील येल्लोरी पाटीवर टँकर थांबवले. याच दरम्यान, पंप मालकाचे पती भगवानराव पाटील यांनी संशयावरून डेपोपासूनच टँकरचा पाठलाग सुरू केला होता. १०० किलोमीटरपर्यंत टँकरचा पाठलाग केल्यानंतर त्यांना येल्लोरी पाटीवर टँकरमध्ये गेल्याचे दिसले. पाटील आत केले असतं टँकरमधून अंदाजे ६० लिटर पेट्रोल (किंमत सुमारे ६३०० रुपये) काढून घेताना टोळीला रंगेहाथ पकडले. पाटील यांनी या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण केले आणि व्यवस्थापक नरवाडे याला पकडून भादा पोलीस ठाण्यात आणले.

खुलेआम चालणाऱ्या गोरखधंद्यावर प्रश्नचिन्हवर्षानुवर्षे महामार्गालगतच्या पाटीवर हा अवैध धंदा बिनधास्तपणे सुरू होता. 'हा गोरखधंदा सर्वांच्या सहकार्याने चालत असून, जागोजागी टोळ्या सक्रिय असल्याने बिनधास्तपणे पंप मालकाची लूट केली जात आहे,' अशी खळबळजनक माहिती भगवानराव पाटील यांनी दिली. ट्रान्स्पोर्ट चालकाच्या फिर्यादीवरून भादा पोलिसांनी टँकर चालक वर्मा, पंप व्यवस्थापक नरवाडे आणि इतर तीन अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या संबंधित कलमांनुसार (BNS ३१६, (३)३(५) नुसार) गुन्हा दाखल केला आहे. फौजदार पुरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

तीन तास रस्त्यावर होता धोकादायक टँकरचोरी पकडल्यानंतर चालक व इतर आरोपी फरार झाले. भरलेला टँकर रस्त्याच्या कडेला लावून ते पसार झाले. तब्बल तीन ते साडेतीन तास टँकर रस्त्यावर उभा होता, ज्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. सपोनि महावीर जाधव यांनी तातडीने ट्रान्स्पोर्ट मालकाशी संपर्क साधून टँकर सुरक्षितरित्या औशात आणले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pump Owner's Bravery: 100km Chase Leads to Petrol Theft Bust

Web Summary : A petrol pump owner's husband bravely chased a tanker for 100km, catching a gang red-handed stealing petrol in Yellori. The owner suspected foul play, leading to the arrest of the tanker driver and manager involved in the theft, exposing a long-running fuel pilfering operation.
टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपlaturलातूरCrime Newsगुन्हेगारी