शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांची तारांबळ, लातूर जिल्ह्यात १७५ पेट्रोलपंपांवरील ८ लाख लिटर इंधन विक्री ठप्प

By हणमंत गायकवाड | Updated: January 2, 2024 18:00 IST

टँकर आणि ट्रकचालकांच्या संपाचा सर्वाधिक फटका इंधन वाहतुकीला बसला आहे.

लातूर : ट्रक, टँकर चालकांनी नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात संप पुकारल्याने त्याचा फटका पेट्रोलपंपांना बसला असून, काही तासांतच इंधन संपल्याने शहरातील पंप बंद करावे लागले. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. काल सोमवारी दुपारनंतर जिल्ह्यातील १७५ पेट्रोलपंपांवर ३ लाख लिटर पेट्रोल आणि साडेपाच लाख लिटर डिझेलची विक्री ठप्प झाली. यामुळे पंपचालकांनाही मोठा तोटा सहन करावा लागला. 

लातूर जिल्ह्यामध्ये टँकर आणि ट्रकचालकांच्या संपाचा सर्वाधिक फटका इंधन वाहतुकीला बसला आहे. शहरातील आणि जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंपांवरील पेट्रोल-डिझेल संपलेले होते. ज्या ठिकाणी काही प्रमाणात इंधन शिल्लक होते, त्या ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या. सामान्य ग्राहकांच्या रोषाला पंपचालकांना सामोरे जावे लागले. जिल्ह्यात १७५ पंप आहेत. त्यापैकी ४० पंप एकट्या लातूर शहरात आहेत. या सर्व पंपांतून पेट्रोल अडीच ते तीन लाख आणि डिझेल पाच ते साडेपाच लाखांची विक्री ठप्प झालेली होती.

अत्यावश्यक सेवेसाठी इंधन देण्याचे निर्देश...वाहतूकदारांचा संप असल्याचे समजताच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पेट्रोलपंपचालकांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी इंधन देण्यात यावे, असे निर्देश दिले. त्यामुळे सामान्य वाहनधारकांना दुपारपर्यंत इंधन मिळाले नव्हते. त्यानंतर शहरातील काही पेट्रोलपंप सुरू झाले. मात्र, रांगा लागलेल्या होत्या. सोमवारी रात्रीपासून ३ वाजेपर्यंत शहरातील सर्वच पेट्रोलपंप बंद होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पेट्रोल-डिझेलची साठेबाजी करू नये, असे आवाहन केले होते. तरीही शिल्लक असणाऱ्या इंधनाची विक्री करण्याचे पेट्रोलपंपचालकांनी टाळलेच होते.

दूध, भाजीपाला वाहतुकीला फटका...दूध संकलन करणाऱ्या वाहनांना आणि भाजीपाल्यांची वाहतूक करणाऱ्या काही वाहनांना पेट्रोल-डिझेल नसल्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागले. दुपारनंतर काही पेट्रोलपंप सुरू झाल्यानंतर वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पेट्रोलपंपांवर बंदचे फलक; बॅरिकेड्सही...वाहनांशिवाय वावरणे शक्य नाही. मात्र, वाहतूकदारांच्या संपामुळे अडचण झाली. पेट्रोलपंपच बंद ठेवावे लागले. शहरातील अनेक पेट्रोलपंपांबाहेर बंदचे फलक लावण्यात आले होते. शिवाय, काही पेट्रोलपंपांवर बॅरिकेड्स लावूनही पेट्रोल नसल्याचे सांगण्यात आले. इंधनाअभावी वाहनधारकांचे मोठे हाल झाले.

काही वाहनधारकांनी कॅन भरून घेतले...सोमवारी रात्री उशिरा पंपांवर थांबून काही वाहनधारकांनी कॅन भरून घेतले. मंगळवारी सकाळपासूनच पंप बंद असल्याने नोकरदार, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. अनेकांनी पेट्रोलपंपानजीकच वाहने उभे करून ठेवली होती.

इंधन आणण्यासाठी १५ टँकर सोलापूरला...लातूर जिल्ह्याला सोलापूर येथील पाखणी येथून इंधन पुरवठा होतो. त्यानुसार १५ टँकर सोलापूरला इंधन आणण्यासाठी गेले होते. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत होईल, असे पंपचालक असोसिएशनचे अध्यक्ष आदेश शहा यांनी सांगितले.

दुपारी ४ नंतर काही पेट्रोलपंप सुरू...दुपारनंतर शहरातील काही पेट्रोलपंप सुरू झाले. इंधन घेण्यासाठी वाहनधारकांनी रांगा लावल्या होत्या. एक नंबर चौक, उषाकिरण, अंबाजोगाई रोड तसेच औसा रोडवरील काही पेट्रोलपंप सुरू झाले होते. सायंकाळनंतर शहरातील आणखी पेट्रोलपंप सुरू होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरPetrol Pumpपेट्रोल पंपagitationआंदोलन