शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपूर्वी पगाराचा आदेश हवेत; लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन अद्याप नाही

By संदीप शिंदे | Updated: October 22, 2022 17:02 IST

ऐन दिवाळीत उसनवारीकरून सण साजरा करण्याची नामुष्की शिक्षकांवर आली आहे

- संदीप शिंदेलातूर : राज्य सरकारने दिवाळी सणासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत सर्वच शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन शनिवार सायंकाळपर्यंत खात्यावर जमा झालेले नाही. दिवाळीचा सण सुरू झाला असून, वेतन न झाल्याने प्राथमिक शिक्षकांना उसनवारीवरच सण साजरा करावा लागत आहे. 

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबरपर्यंत सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचा आदेश राज्य शासनाने काढला होता. त्यानुसार तातडीने बिलेही जमा करण्यात आली. जि. प. माध्यमिक, खाजगी शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन शुक्रवारीच खात्यावर जमा करण्यात आले. मात्र, जिल्हा परिषद शिक्षकांना शनिवार सायंकाळपर्यंत वेतन मिळालेले नाही. विशेष म्हणजे, रविवार, सोमवार असे दोन दिवस शासकीय सुटी आहे. त्यामुळे मंगळवारीच वेतन होईल, अशी अपेक्षा शिक्षकांना आहे. 

दरम्यान, सर्वच जि. प.च्या मुख्याध्यापकांना वेळेत बिले तालुकास्तरावर जमा केली. त्यानुसार जिल्हास्तरावरही पोहोच करण्यात आलेली आहेत. मात्र, शासनाकडून १२ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी कमी आलेला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे वेतन करता येत नसल्याचे समोर येत आहे. शुक्रवारपासून दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे. या सणानिमित्त वेतन लवकर हाती पडेल व दिवाळीचा सण धूमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन शिक्षकांनी केले होते. मात्र, वेतनच न झाल्याने उसनवारीच सण करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.

बजेट मिळताच वेतन जमा करणारशासनाकडून १२ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी कमी आल्याने प्राथमिक शिक्षकांचे वेतन करण्यात अडचणी येत आहेत. वेतनाची बिले तयार आहेत. शासनाकडून निधी मिळताच तातडीने शिक्षकांचे वेतन खात्यावर जमा करण्यात येईल.-वंदना फुटाणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

आम्ही दिवाळी कशी साजरी करावी?वर्षातील सर्वांत मोठा सण दिवाळी आहे. मात्र, या महत्त्वाच्या सणालाच शाासनाचे आदेश असतानाही वेळेत वेतन झालेले नाही. त्यामुळे उसनवारी करून दिवाळीची खरेदी करावी लागत आहे. पुढील दोन दिवस शासकीय सुटी असल्याने वेतन मंगळवारपर्यंत तरी मिळण्याची शक्यता नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषदTeacherशिक्षक