नागपूर-जबलपूर मार्ग उपलब्ध
पुण्याएवजी लातूरमार्गे सुरू करण्याची मागणी केली हाेती. त्यावेळी नागपूर, गाेंदिया-नैनपूर-जबलपूर हा मार्ग उपलब्ध नव्हता. आता हा मार्ग सुरू झाला आहे. इटारशी मार्गावर वाहतूक अधिक आहे. मात्र, गाेंदिया-नैनपूर-जबलपूर या मार्गावर वाहतूक अधिक नाही. लातूर ते लातूर राेड हे अंतर ३३ किलाेमीटरचे असून, या मार्गावर तीन मिनिटांचा लूज टाइम आहे. ताे कमी करावा, नांदेड ते अदिलाबाद हा मार्ग १८५ किलाेमीटरचे आहे. या मार्गावर एक तास लूज टाइम आहे, ताे कमी करावा, अदिलाबाद ते माजरी हे अंतर १०१ किलाेमीटरचे असून, या मार्गावरही एक तासाचा लूज टाइम आहे. ते कमी करण्याची गरज आहे. यातून सात तासांची आणि पैशाची बचत हाेणार आहे, असेही श्यामसुंदर मानधना यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.