लातूर : देशात प्राचीन काळापासून अनेक समाजसुधारक संत मंडळी होऊन गेली. प्रत्येकजण आपापल्या शिकवणी व तत्वज्ञानामुळे प्रख्यात झाले. त्यापैकी संत कबीर यांची दोहेरुपी शिकवण जगासाठी मार्गदर्शक होती. अज्ञान, अंधश्रध्दा, कर्मवाद, वास्तव आणि विज्ञानवाद यावर समग्र दोहे यातून समाजाला कबीरांनी शिकवण दिली. त्यामुळे संत कंबीरांचे दोहे म्हणजे गौतम बुध्दांचा वास्तववादी विज्ञानवादी उपदेशच होय, असे प्रतिपादन भिक्खू पय्यानंद यांनी केले.
ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्ताने बौध्द धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने महाविहार, सातकर्णी नगर येथे संस्थेचे अध्यक्ष भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मदेशना व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संशोधक डॉ. आनंद नरंगलकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. देवदत्त सावंत यांनी केले तर डॉ. दुष्यंत कटारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जी. एस. साबळे, प्रा. डॉ. संजय गवई, परमेश्वर आदमाने, अनिरुध्द बनसोडे, शिवाजी सोनवणे, डॉ. अरुण कांबळे, उदय सोनवणे उपस्थित होते.