शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओचा दणका! ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ८४१ वाहनधारकांना २ कोटी ३७ लाखांचा दंड

By आशपाक पठाण | Updated: May 28, 2024 19:30 IST

एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत लातूरच्या परिवहन विभागाने राबविलेल्या वाहन तपासणीत २ हजार ८८० अवजड वाहनांची तपासणी करण्यात आली.

लातूर : मालवाहतूक वाहनांची बांधणी करीत असताना प्रत्येक वाहनांची क्षमता निश्चित केली जाते. त्यानुसार वाहनांची परिवहन विभागाकडे नाेंदणीही केली जाते. मात्र, प्रत्यक्षात वाहतूक करीत असताना २० टक्के ओव्हरलोड वाहतूक करीत असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षभरात प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने तपासणी केलेल्या २ हजार ८८० वाहनांत ८४१ वाहने ओव्हरलोड आढळली असून, त्यांच्याकडून २ कोटी ३७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणे मोटार वाहन कायद्याने गुन्हा आहे. तपासणीत ओव्हरलोड आढळून आल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाची पथके कारवाई मोहीम राबवितात. लातूर जिल्ह्यातून रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या मार्गावर पथकाची नजर असते. शिवाय, लातूरला मोठी बाजारपेठ असल्याने विविध प्रकारची मालवाहतूक केली जाते. त्यात कृषी मालाचाही समावेश आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत लातूरच्या परिवहन विभागाने राबविलेल्या वाहन तपासणीत २ हजार ८८० अवजड वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात किरकोळ वाढ आढळून आलेल्या वाहनांना समज देऊन सोडण्यात आले. पण, ५०० किलोपेक्षा अधिक ओव्हरलोड असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ओव्हरलोड वाहन थेट काट्यावर...प्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहन तपासणीत ओव्हरलोड वाहतुकीचा संशय आल्यास संबंधित वाहन थेट काट्यावर नेले जाते. एकदा का काटा झाला अन् त्यात ओव्हरलोड माल आढळून आला की लागलीच ऑनलाईन दंड मारला जातो. यासाठी परिवहन विभागाचे स्वतंत्र पथक रस्त्यावर असते. बार्शी रोड, रिंग रोड, औसा रोड, अंबाजोगाई रोड, नांदेड, तुळजापूर मार्गावर पथकाचे विशेष लक्ष असते. या पथकाकडून ट्रक, टेम्पोसह ग्रामीण भागातून येणारी छोटी वाहनेही तपासली जातात.

हेल्मेट, सीटबेल्टचाही दंड...प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने वर्षभरात २ हजार ८६० दुचाकी चालकांना हेल्मेटचा वापर न केल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ९ लाख ५७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच २ हजार २१७ चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली असता त्यात ७३९ जणांनी सीटबेल्ट लावला नसल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून ७ लाख ३६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक नको...वाहनधारकांनी क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करू नये. परिवहन विभागाच्या तपासणीत ओव्हरलोड वाहतूक आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. मागील वर्षभरात २ कोटी ३७ लाख ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ओव्हरलोड मालवाहतूक केल्यास वाहनांचे नुकसान होतेच शिवाय अपघाताचा धोका असतो, त्यामुळे वाहन मालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. - आशुतोष बारकुल, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरRto officeआरटीओ ऑफीस