शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याचा धुमाकूळ; वयोवृद्ध पती-पत्नीचा खून; महिलेच्या डाेक्यात कुकर घातला; वृद्धाला विहिरीत फेकले

By राजकुमार जोंधळे | Updated: May 28, 2025 23:20 IST

गरसुळी येथील रावसाहेब मुकुंद कातळे (वय ६०) व त्यांची पत्नी पुष्पलता रावसाहेब कातळे (५२) हे दोघेही गावालगत असलेल्या स्वत:च्या शेतात राहतात. रावसाहेब यांना अर्धांगवायू असल्याने ते अंथरुणावरच होते.

लातूर : जिल्ह्यातील गरसुळी (ता. रेणापूर) येथील शेतात राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याचा खून करून दागिने लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. २७ मे रोजी उघडकीस आलेल्या या घटनेत चोरट्याने अत्यंत क्रूरपणे अर्धांगवायू झालेल्या वृद्ध व्यक्तीस विहिरीत फेकले, तर वृद्ध महिलेचा डोक्यात कुकर घालून, दगडाने ठेचून तिचा खून केला. 

गरसुळी येथील रावसाहेब मुकुंद कातळे (वय ६०) व त्यांची पत्नी पुष्पलता रावसाहेब कातळे (५२) हे दोघेही गावालगत असलेल्या स्वत:च्या शेतात राहतात. रावसाहेब यांना अर्धांगवायू असल्याने ते अंथरुणावरच होते. त्यांचा एकुलता एक मुलगा कामानिमित्त हैदराबाद येथे राहतो. दरम्यान, दोघेच वयोवृद्ध राहत असल्याचा अंदाज घेऊन २५ ते २७ मेदरम्यान चोर शेतात आला. तो चोरी करीत असताना पुष्पलता यांनी विरोध केला. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या डोक्यात कुकर घातला, दगडानेही मारले. हा खून होत असताना अंथरुणावर पडलेले रावसाहेब कातळे यांनी पाहिले. त्यानंतर आरोपीने रावसाहेब यांनाही मारहाण करून उचलून शेताशेजारी असलेल्या काकासाहेब पवार यांच्या विहिरीमध्ये फेकले.

२७ मे रोजी खून उघडकीस...

शेताशेजारी पवार यांच्या शेतातील नोकर तण काढण्यासाठी २७ मे रोजी शेतात फिरत असताना विहिरीकडे गेला. त्यावेळी त्याला विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खुनाचा उलगडा झाला. ओळख पटल्यानंतर कातळे यांचे नातेवाईक माउली विष्णू पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

पुष्पलता यांची चोरट्याशी झुंज...

पुष्पलता यांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी विरोध दर्शविला. चोरट्याशी झटापट झाली. घटनास्थळावरील कुकर, दगड आणि पसरलेले साहित्य पाहून नातेवाईक फिर्यादी माउली पवार यांनी खून चोरीच्या उद्देशाने झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर २७ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्ह्यातील आरोपी गावातीलच रहिवासी...

चोरीच्या उद्देशाने वयोवृद्ध दाम्पत्याचा खून करणारा आरोपी गावातीलच असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर १२ तासांत आरोपी पंडित कोंडिबा रावणकोळे याला अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले. आरोपीची चोरीची पार्श्वभूमी असून, यापूर्वी ट्रॅक्टर भरून हरभरा नेऊन त्याने त्याची विक्री केली होती. दरम्यान, पुष्पलता कातळे यांनी आरोपीला ‘चोरट्या, माझ्या शेतात का आलास?’ असे यापूर्वी म्हटले होते. चारचौघांत चोरीचा आरोप केल्याचा राग मनात धरून हा खून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.