शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रितेश-जीनीलिया तुळजाभवानी चरणी; लातुरात ‘वेड’च्या पहिल्या शोसाठीही गर्दीत लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 15:24 IST

अभिनेता रितेश यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही दमदार पाऊल टाकत मराठीतील ‘वेड’ दिग्दर्शित केला आहे.

लातूर/ उस्मानाबाद/ तुळजापूर : पहिला हिंदी चित्रपट ‘तुझे मेरी कसम’चा प्रीमियर शो लातूरमध्येच करून सुपरहिट चित्रपटांची मालिका चाहत्यांसमोर आणणाऱ्या रितेश-जीनीलिया जोडीने मराठी चित्रपट निर्मिती अन् दिग्दर्शनाचे ‘वेड’ही तुफान गर्दीने पूर्ण केले. शुक्रवारी पहिल्या दिवशीच्या ‘शो’ला दोघांनी हजेरी लावली. तत्पूर्वी तुळजापुरात जाऊन श्री तुळजाभवानी देवीचे दर्शनही घेतले.

अभिनेता रितेश यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही दमदार पाऊल टाकत मराठीतील ‘वेड’ दिग्दर्शित केला आहे. शुक्रवारी सकाळी त्यांनी तुळजापुरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी पुजारी भोपे भाऊसाहेब पाटील यांनी दोघांचाही सत्कार केला. त्यावेळी मंदिर परिसरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली. आवडत्या अभिनेत्यासोबत एक छबी टिपण्यासाठी तरुणांनी गराडा घातला. त्यानंतर रितेश-जीनीलिया तुळजापुरातील सिनेमागृहात गेले. तेथील प्रचंड गर्दीमुळे दोघांनीही बाहेरूनच चाहत्यांना अभिवादन केले आणि लातूरकडे प्रयाण केले.

माझे मराठीचे ‘वेड’ रितेशने पूर्ण केले...यावेळी जीनीलिया म्हणाल्या, आम्ही दोघांनी मिळून मराठी चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन करावे, अशी इच्छा होती. ती रितेश यांनी ‘वेड’च्या निमित्ताने पूर्ण केली. नक्कीच हा चित्रपट सर्वांना आवडेल. रितेश म्हणाले, देशमुख कुटुंबीय नवीन कार्याचा प्रारंभ श्री तुळजाभवानी मातेचे पूजन व दर्शन करून करतो. त्यासाठी आलो आहे. सर्वांनी चित्रपट पाहावा, तो नक्कीच आवडेल.

लातुरात हाऊसफुल्ल गर्दी...लातुरात चित्रपटगृहांमध्ये सकाळी सात वाजता पहिला शो होता. दुपारनंतरच्या शोसाठी रितेश आणि जीनीलियाही दाखल झाले. त्यांनी प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहिला. त्यावेळी चाहत्यांच्या गर्दीने चित्रपटगृह, परिसर आणि रस्ते ओसंडून वाहत होते.

टॅग्स :Ritesh Deshmukhरितेश देशमुखGenelia DSouzaजेनेलिया डिसूजाlaturलातूरVed Marathi Movieवेड चित्रपट