यावेळी गुरु पी.जी. पाटील, डी.वाय. हेरकर, एन.बी. रायवाड, डी.बी. जाधव, विद्याभुषण मुडपे, एल.पी. अंबेगावे, एन. बी. कोयले उपस्थित होते, तर वर्गमित्र राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज म. पाटील नागराळकर, नागप्पा अंबरखाने ब्लड बँकचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, उमाकांत पाटील औरंगाबाद, वैजनाथ दुलंगे, बलराम येरमे, अशोक घुगे, सुरेश हाळीकर, नामदेव वट्टमवार आदी उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था उदगीरचे अध्यक्ष बसवराज म. पाटील नागराळकर, बलराम येरमे व रमेश अंबरखाने यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला. राम जाधव लिखित गुरू दि. ली. होळीकर यांच्या जीवनावरील 'देवमाणूस' हे ग्रंथ भेट देण्यात आले. तसेच सैनिकी विद्यालयाच्या परिसरात गुरु व वर्गमित्रांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.