लातूर शहरातून दुचाकीची चोरी
लातूर : शहरात एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी क्र. एमएच २३ एक्यू २२६८ चोरीला गेल्याची घटना ८ जून रोजी घडली. या प्रकरणी फिर्यादी शत्रुघ्न शेषेराव येडे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. पुढील तपास पोहेकॉ. गिरी करीत आहेत. दरम्यान, लातूर शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
कुळव मारू नको म्हणून मारहाण
लातूर : शेतात कुळव मारत असताना संगनमत करून तू इथे कुळव मारू नको, असे म्हणून शिवीगाळ करण्यात आली. तसेच फिर्यादीच्या हातावर तसेच डोक्यात आणि पाठीत मारून जखमी केले. सोडविण्यासाठी गेले असता मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी फिर्यादी शरद विलास डोंगरे (सावरी, ता. निलंगा) यांच्या तक्रारीवरून भरत चंदर डोंगरे व सोबत असलेल्या दोघाजणांविरुद्ध औराद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. गौंडगावे करीत आहेत.
पेरणीचे ट्रॅक्टर अडवून एकास मारहाण
लातूर : पेरणीचे ट्रॅक्टर अडवून फिर्यादीस शेतीचा हिस्सा अगोदर आम्हाला दे असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना जानापूर शेतशिवारात घडली. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी विनोद प्रभाकर जाधव यांच्या शेतात जाऊन पेरणीचे ट्रॅक्टर अडवून शेतीचा हिस्सा अगोदर आम्हाला दे असे म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच शेतात पाय ठेवलास तर जिवंत ठेवणार नाही, म्हणून धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी विनोद जाधव यांच्या तक्रारीवरून मोहन शंकर जाधव व सोबत असलेल्या तिघाजणांविरुद्ध (रा. होकर्णा, ता. कमालनगर) उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. धुळशेट्टे करीत आहेत.