पोलिसांनी सांगितले, शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास देवर्जन, ता. उदगीर येथील ६० वर्षीय वृद्ध महिला सागरबाई दत्तू कांबळे या आजारी असल्याने उपचारासाठी उदगीर येथे दवाखान्यात जाण्यासाठी एका अनोळखी ऑटोमध्ये बसून निघाल्या होत्या. ऑटो चालक व फिर्यादी महिलेच्या शेजारी बसलेल्या अनोळखी मुलाने पुढे रस्त्यावर आरटीओ वाहन चेकिंग करत असल्याचा बहाना करून ऑटो बनशेळकी गावातून उदगीर येथील रिंग रोडने नेत्रगाव रोडवर आणले. धुरपत माता आश्रम शाळेच्या पुढे घेऊन जाऊन दोघा आरोपींनी जबरीने फिर्यादीच्या गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र व पाच ग्रॅम सोन्याचे पान व बटव्यातील रोख रक्कम तीन हजार रुपये असा एकूण तीस हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन फिर्यादी महिलेसह तेथेच सोडून पळून गेले. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी रात्री उशिरा दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी पल्लेवाड हे करीत आहेत.
वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST