शहराच्या पश्चिम भागात तुलनेने अधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:26 AM2021-02-26T04:26:34+5:302021-02-26T04:26:34+5:30

सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी इत्यादी लक्षणाचे रुग्ण आहेत का, याबाबतची माहिती संकलित करून त्यांची चाचणी केंद्रावर चाचणी केली ...

Relatively more patients in the western part of the city | शहराच्या पश्चिम भागात तुलनेने अधिक रुग्ण

शहराच्या पश्चिम भागात तुलनेने अधिक रुग्ण

Next

सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी इत्यादी लक्षणाचे रुग्ण आहेत का, याबाबतची माहिती संकलित करून त्यांची चाचणी केंद्रावर चाचणी केली जात आहे. शिवाय, सर्दी, ताप, खोकला असलेल्यांना घराबाहेर पडू नये. कोणाच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहनही केले जात आहे. चाचणीचा अहवाल येईपर्यंत घरामध्येदेखील कुटुंबात इतर सदस्यांपासून विलगीकरणात राहावे. कमीत कमी संपर्क ठेवावा. महापालिकेच्या कोविड चाचणी केंद्रावर चाचणी करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

चाचणीसाठी शहरात चार केंद्र

समाजकल्याण वसतिगृह मार्केट यार्ड, पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय औसा रोड, पंडित जवाहरलाल नेहरू मनपा रुग्णालय पटेल चौक, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र इंडियानगर या ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. नागरिकांनी पुढील काही दिवस मास्कचा वापर करावा, दक्षता घ्यावी, हँड सॅनिटायझरचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे या त्रिसूत्रीचा वापर करून कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांची चाचणी

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. लातूर शहरामध्येही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील वसतिगृह, कोचिंग क्लासेसचालकांनी त्यांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची कोविड-१९ चाचणी करून घ्यावी. यासाठी महापालिकेचे स्वतंत्र पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रामेश्वर कलवले यांच्या नियंत्रणाखाली हे पथक गठित करण्यात आले आहे. समाजकल्याण वसतिगृह मार्केट यार्ड, पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, औसा रोड, पंडित जवाहर नेहरू मनपा रुग्णालय पटेल चौक आणि प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र इंडियानगर येथेही विद्यार्थ्यांच्या चाचण्या केल्या जातील.

Web Title: Relatively more patients in the western part of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.