शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Rain: चौथ्या दिवशीही लातुरात पावसाची जोरदार बॅटिंग! पूल गेले वाहून, चार गावांचा संपर्क तुटला

By राजकुमार जोंधळे | Updated: September 11, 2022 15:12 IST

Rain: गुरुवारी दुपारपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी धुमाकूळ घातला आहे. परिणामी, शेकडो हेक्टरवरील खरिपाची पिके पाण्याखाली गेली आहे.

- राजकुमार जोंधळे लातूर : गुरुवारी दुपारपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी धुमाकूळ घातला आहे. परिणामी, शेकडो हेक्टरवरील खरिपाची पिके पाण्याखाली गेली आहे. तर निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील औराद - तगरखेडा, औराद - वांजरखेडा, सावरी - जामगा  आणि औराद ते मानेजवळगा या मार्गावरील पूल पावसाच्या पाण्याने वाहून गेले आहेत. दरम्यान, या गावांचा गेल्या चार दिवसापासून संपर्क तुटला आहे. या मार्गावरील वाहतूक सध्याला ठप्प झाली आहे. लातूरसह जिल्ह्यात गुरुवार, शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. दिवस-रात्र थांबून-थांबून पाऊस पडत आहे. काही भागात शनिवार आणि रविवारी सकाळपासूच पावसाने हजेरी लावली. परिणामी, ग्रामीण भागातील नदी, नाले आणि नद्यांना पूर आला आहे. नदी-नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने ठिकठिकाणच्या पुलावरुन पावसाचे पाणी वाहत आहे. तर नदी, नाले काठावर असलेल्या शेतात पाणी शिरले असून, पिके पाण्यात आहेत. सध्याला लातूर जिल्ह्यातील बहुतांश गावातील खरिपाच्या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

पावसाने महामार्गाचे नुकसान...गेल्या दोन आठवड्यापासून पडणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील बहुतांश रस्त्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, बिदर ते नांदेड महामार्गावरील उदगीर-अहमदपूर दरम्यानच्या मार्गाची मोठी हानी झाली आहे. या मार्गावरून वाहन चालविणे अवघड बनले आहे. 

वीजेच्या धक्क्याने म्हशी दगावल्या..पाऊस सुरू असताना विजेच्या तारा तुटून बसलेल्या वीजेच्या धक्क्याने दोन म्हशी दगवल्याची घटना निलंगा तालुक्यातील सिंदखेड येथे घडली. तर  धानोरा येथे भिंत कोसळल्याने दोन मेंढ्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील रामराव मुकदम पाटील यांच्या घराची भिंत कोसळली आहे.

टॅग्स :Rainपाऊस