शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू अड्ड्यांवर छापासत्र; ३५ लाखांची देशी-विदेशी जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: August 4, 2023 19:35 IST

उत्पादन शुल्कची कारवाई : १४१ गुन्ह्यात १२८ जणांना अटक

राजकुमार जाेंधळे, लातूर : जिल्हाभरातील विविध तांड्यावर असलेल्या हातभट्टी निर्मिती अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारला. याबाबत एकूण १४१ गुन्हे दाखल केले असून, १२८ जणांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल १२ हजार २२० लिटर हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे रसायन, ३ हजार २२ लिटर हातभट्टी दारू, ९७९ लिटर देशी दारू, १५१ लिटर विदेशी दारू, २२ चारचाकी, दुचाकी वाहने असा एकूण ३४ लाख १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर हातभट्टी निर्मिती आणि विक्री हाेत असल्याने लातूर आणि उदगीर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १ ते ३ ऑगस्टदरम्यान वसंतनगर तांडा, नेहरुनगर तांडा, डाेंगरशेळकी तांडा, लातूर आणि उदगीर विभागातील ढाब्यावर छापा मारला. यावेळी ढाब्यावर अवैध दारू घेणाऱ्या आणि देणाऱ्या ढाबा मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात ८ जणांसह २ ढाबा मालकांना अटक केली आहे. लातूर जिल्ह्यात सलग तीन दिवस विविध ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी निर्मिती अड्ड्यांवर छापा मारून, तब्बल ३४ लाख १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. याबाबत एकूण १४१ स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, १२८ जणांना केली आहे.

ही कारवाई अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर.एस. काेतवाल, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल.बी. माटेकर, ए.के. शिंदे, स्वप्निल काळे, ए. बी. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, अनंत कारभारी, नीलेश गुणाले, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार, एस.जी. बागेलवाड, संताेष केंद्रे, एकनाथ फडणीस, पुंडलिक खडके, विक्रम परळीकर यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी