शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

एकाचवेळी तीन जुगार अड्ड्यांवर छापा; आनंदवाडी, मरशिवणी शिवारात विशेष पथकाची कारवाई

By राजकुमार जोंधळे | Updated: October 8, 2022 16:36 IST

पोलिसांनी बारा जुगाऱ्यांना पकडले तर तिघांनी केले पलायन

अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील आनंदवाडी, मरशिवणी शिवारातील आखाड्यावर सुरु असलेल्या तिर्रट जुगारावर विशेष पाेलीस पथकाने एकाचवेळी छापा मारला. यावेळी बारा जणांना पकडले असून, तिघे पळून गेले आहेत. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, राेख रक्कम असा एकूण ५ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पाेलिसांनी सांगितले, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर-चाकूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाने अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवाडी आणि मरशिवणी शिवारातील आखाड्यावर असलेल्या जुगारावर ८ ऑक्टाेबर राेजी छापा मारला. यावेळी तिर्रट नावाचा जुगार खेळताना १५ जण आढळून आले. यातील बारा जणांना पाेलीस पथकाने ताब्यात घेतले असून, तिघे जण पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात गुरनं. ४७९/२०२२ आणि गुरनं. ४८० / २०२२ कलम ४, ५ मुंबई जुगार कायद्यान्वये स्वतंत्र दाेन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून पाेलिसांनी जुगाराचे साहितय, वाहने, माेबाईल फाेन, राेख रक्कम असा एकूण ५ लाख १९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम यांच्या पथकातील पाेलीस कर्मचारी हाके, कलमे, पुट्टेवाड, अंधूरकर, हंगरगे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर