शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विक्रीप्रकरणी धाडसत्र; ५७८ अडकले पथकाच्या जाळ्यात !

By राजकुमार जोंधळे | Updated: November 21, 2023 19:22 IST

‘उत्पादन शुल्क’ची कारवाई, सव्वा काेटीचा मुद्देमाल जप्त...

लातूर : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री हाेत असल्याचे धाडसत्रातून समाेर आले आहे. एप्रिल ते ऑक्टाेबर या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लातूर आणि उदगीर येथील पथकांनी स्वतंत्रपणे केलेल्या कारवायांत एकूण ५७८ मद्यपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. याप्रकरणी संबंधितांविरोधात एकूण ५२३ गुन्ह्यांची नाेंद करण्यात आली आहेत. विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये ६२ वाहनांसह एकूण १ काेटी १३ लाख ६० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील वाडी-तांड्यांसह ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणावर चाेरट्या मार्गाने अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याचे धाडसत्रात समाेर आले आहे. काहीजण छाेट्या-छाेट्या गावात अवैध देशी, हातभट्टी दारूची विक्री करीत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकांनी विविध ठिकाणी धाडी टाकल्या. यावेळी अवैध देशी दारू, हातभट्टी आणि त्याच्या निर्मितीसाठी लागणारे हजाराे लिटर रसायन जप्त करण्यात आले आहे. एप्रिल ते ऑक्टाेबरअखेर पथकाने केलेल्या कारवायांत तब्बल ५७८ आराेपी पथकाच्या जाळ्यात अडकले. याबाबत त्यांच्याविराेधात ५२३ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाडी-तांड्यांवर धाडी; वाहनांतून दारू वाहतूक...लातूर, उदगीर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवायांत माेठ्या प्रमाणावर चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक हाेत असल्याचे आढळून आले आहे. यावेळी वाहनांसह माेठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूचा साठा पथकाने जप्त केला आहे. गत सात महिन्यांत ६२ वाहने जप्त केली आहेत.

अवैध दारूप्रकरणी पथक करणार कारवाई...लातूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर हाेणारी अवैध दारूविक्री आणि वाहतूक राेखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाकडून प्रयत्न केले जातात. अवैध दारूबाबत स्थानिक नागरिकांनी उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी. त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल. ही कारवाई सुरूच राहणार आहे. - केशव राऊत, अधीक्षक, लातूर

लातूर जिल्ह्यातील सात महिन्यांत धाडी...दाखल गुन्हे - ५२३वारस - ४८८बेवारस - ०३४आरोपी - ५७८जप्त वाहने - ०६२एकूण मुद्देमाल - १,१३,६०,४२०

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर