शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात अवैध धंदे, जुगारावर छापा; ३८ जणाविरोधात गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Updated: August 9, 2023 18:38 IST

दोन दिवसांत १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध व्यवसाय, जुगारावर एकाच वेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने छापा मारला असून, याबाबत एकूण ३८ जणाविरोधत गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार, मटका आणि अवैध दारु विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षकांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांनतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच वेळी अवैध व्यवसायावर छापेमारी केली. याप्रकरणी जुगार आणि  दारूबंदी कायद्यान्वये पाच जणाविरोधात गुन्हे दाखल केला. यावेळी ७ लाख ६ हजार ५२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत छापासत्र सुरुच होते. यात लातूर जिल्ह्यातील देवणी आणि गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा मारून ३८ जुगारऱ्याविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. संध्याकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने देवणी तालुक्यात एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तर दुसऱ्या पथकाने लातुरातील गांधी चौक ठाण्याच्या हद्दीत साठफूट रोडवर एका बारच्या पाठीमागे पत्राच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगारावर छापा मारला. यावेळी दोन्ही ठिकाणी ३८ जुगारी तिर्रट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलीस पथकाने जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि वाहने असा ८ लाख १७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. व्यंकटेश आलेवार, खुर्रम काझी, रवी गोंदकर, दीनानाथ देवकते, यशपाल कांबळे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, जमीर शेख, नकुल पाटील यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर