शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात जुगार अड्ड्यावर छापा; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: June 19, 2023 19:43 IST

एमआयडीसी ठाण्यात १४ जुगाऱ्यांवर गुन्हा...

लातूर : शहरालगत असलेल्या खाडगाव शिवारात एका झाडाखाली सुरू असलेल्या जुगारावर पाेलिस पथकाने रविवारी रात्री उशिरा अचानकपणे छापा मारला. यावेळी राेख रक्कमेसह एकूण १५ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत साेमवारी एकूण १४ जुगाऱ्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरालगत असलेल्या असलेल्या खाडगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाखाली तिर्रट नावाचा जुगार सुरू असून, बीड, धर्मापुरी, परळी वैजनाथ, धाराशिव, रेणापूर, लातूर आदीं परिसरातून जुगार खेळण्यासाठी जुगारी आल्याची माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पाेलिस पथकाने खाडगाव शिवारात रविवारी अचानकपणे छापा मारला. यावेळी माेबाइल, राेख रक्कम, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा जवळपास १५ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात एकूण १४ जुगाऱ्यांविराेधात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे यांनी दिली.

कारसह ७ दुचाकी,११ माेबाइल जप्त...लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी ठाण्याच्या पाेलिस पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये जुगाऱ्यांकडून एक कार, ७ दुचाकी, ११ माेबाइल आणि राेख ५९ हजार ७०० रुपये असा जवळपास १५ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ही कारवाई रात्री उशिरा पाेलिस पथकाने केली.

१० जुगारी जाळ्यात; चार जणांचे पलायन...खाडगाव शिवारात टाकण्यात आलेल्या छाप्यात एकूण १४ जुगाऱ्यांपैकी १० जुगाऱ्यांना पकडण्यात पाेलिस पथकाला यश आले असून, चार जुगारी अंधाराचा फायदा घेत पळाले आहेत. हे जुगारी लातूरसह शेजारच्या बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील असल्याचे पाेलिस उपनिरीक्षक संदीप कराड म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर