शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

'आधी पूल बनवा नंतर पाणी सोडा'; घनसरगाव बॅरेजेससमोर ग्रामस्थांचे आंदोलन

By संदीप शिंदे | Updated: May 16, 2023 15:49 IST

पुलाचे काम सुरु असल्याने रेणा प्रकल्पातून दहा दिवसानंतर पाणी सोडणार

रेणापूर : रेणा मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात व घनसरगाव, रेणापुर, खरोळा बॅरेजेसमध्ये उन्हाळी हंगामासाठी मंगळवारपासून पाणी सोडण्यात येणार होते. मात्र, घनसरगावकडे जाणाऱ्या नदीतील पुलाचे काम सध्या सुरू आहे. पाणी सोडल्यास या पुलाचे काम थांबेल. परिणामी, पुल तयार करण्यास विलंब होईल म्हणून माजी सरपंच शरद दरेकर यांच्या नेतृत्वाखाली घनसरगाव बॅरेजेसमाेर मंगळवार आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत दहा दिवसानंतर पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

रेणा नदी काठच्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंचनासाठी मध्यम प्रकल्पातून मंगळवारी पात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. मात्र, दुसरीकडे रेणा नदीवर घनसरगावजवळ सुरू असलेले पुलाचे बांधकाम बंद करावे लागणार होते. किमान दहा दिवस तरी पाणी सोडु नये, अशी ग्रामस्थांची मागणी होती. मात्र, प्रशासनाने रेणा मध्यम प्रकल्पातुन नदी पात्रात मंगळवारी सकाळी आठ वाजता पाणी सोडण्याचे निश्चित केले होते. याबाबत शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सुचनाही पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, उपविभागीय अधिकारी एस.एम.निटुरे, शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केल्या होत्या. दरम्यान, घनसरगाव येथील ग्रामस्थांनी पुलाचे काम दहा दिवसांत पुर्ण होईल, तोपर्यंत पाणी सोडू नये, या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार रविवारी इंजिनियर मुकदम, डेप्युटी इंजिनिअर मुळे व शाखा अभियंता थडकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. मात्र, तरीही मंगळवारी पाणी सोडण्याची तयारी प्रशासनाकडून सुरु असल्याने ग्रामस्थांनी मंगळवार सकाळपासून बॅरेजेसमोर आंदोलन सुरु केले. त्यामुळे उघडलेले दरवाजे बंद करुन आंदोलनस्थळी पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, खरोळा येथील ग्रामस्थ व पुलाचे काम करणाऱ्या संबंधित विभागाचे कर्मचारी यांनी संवाद साधत २६ मे रोजी प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. तसेच दहा दिवसात पूल बांधकाम करणाऱ्या गुत्तेदारांनी फाउंडेशनचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, रेणाचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, खरोळ्याचे सरपंच धनंजय देशमुख, बाळासाहेब देशमुख, एस.आर. थडकर, एस.एम. निटुरे, शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी, अभियंता शोएबअली खान, असलम शेख, माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात यांचा होता सहभाग...घनसरगाव बॅरेजसमोर करण्यात आलेल्या आंदोलनात माजी सरपंच शरद दरेकर, प्रताप देशमुख, हेमंत दरेकर, ॲड. महादू कांबळे, अशोक शिंदे, चंद्रकांत पवार, वैजनाथ मदने, विलास आमनावर, कल्याण सूर्यवंशी, देविदास वीरकर, वाजीद पठाण, साहेबराव शिंदे, दत्ता धनवे, दत्ता शिंदे, विश्वनाथ गाडे, शेपू शेख, काला कांबळे, गोविंद शहापुरे, साधु खटके, तानाजी खटके, मौला शेख, सतीश दरेकर, अशोक शिंदे, राहुल कांबळे, तुकाराम कांबळे, माणिक दरेकर, माणिक आमनावर, युवराज कांबळे, मनोहर आमनावर, इब्राहिम शेख, शंकर शाहू आदींसह घनसरगाव व खरोळा येथील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीlaturलातूर