दयानंद विज्ञान महाविद्यालयातील संशोधन केंद्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत ऑनलाइन पीएच.डी. कोर्सवर्कच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, डॉ. ललित ठाकरे, प्रा. औदुंबर मुळे यांची उपस्थिती होती. डॉ. दरगड म्हणाले, पाश्चिमात्य देशाप्रमाणे संशोधनाच्या क्षेत्रात पुढे पाऊल टाकले पाहिजे. नोबेल पारितोषिक मिळेल अशा दर्जाचे संशोधन झाले पाहिजे. संशोधनातून संशोधक, शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक क्षेत्रात भर घातली पाहिजे. पीएच.डी. कोर्सवर्कच्या माध्यमातून संशोधकाने संशोधन करण्याचा उद्देश, संशोधनाच्या पद्धती, संशोधनाच्या पायऱ्या, संगणक क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान समजून घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी केले. या वेळी प्रा. औदुंबर मुळे, डॉ. ललित ठाकरे आदींसह प्राध्यापक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.