लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयाेजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बाेलत हाेते. बैठकीला लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती. राज्यमंत्री संजय बनसाेडे म्हणाले, राष्ट्रवादी काॅँग्रेस पक्ष हा लातूर जिल्ह्यात वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने समाजातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न साेडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरात जनता दरबार सुरू करण्याचा मानस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार घराघरात पाेहचविण्यास राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रभागनिहाय बूथ रचना करण्यावर भर द्यावा, असेही राज्यमंत्री बनसाेडे म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदशे संघटक मुफ्ती फय्याज, रेखाताई कदम, मनिषाताई काेकणे, गजानन खमीतकर, समीर शेख, फेराेज शेख, नामदेव जाधव, बाळासाहेब जाधव, बरकत शेख, फारुख शेख, राजेश खटके, राम रायेवार, जितेंद्र गायकवाड, विशाल विहिरे, मुन्ना तळेकर, डी़ उमाकांत, राहुल बनसाेडे, आषिश हाजगुडे, प्रदीप पाटील, बंटी राठाेड, बालाजी चाैरे, प्रशांत सवई, इरफान बागवान, प्रवीण थाेरात, जहाॅगीर शेख, हणमंत राजपूत, फेराेज सय्यद, इरफान शेख, कबीर शेख, बाबा माेमीन आदींची प्रमुख उपस्थिती हाेती.