शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर शहरातील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण

By राजकुमार जोंधळे | Updated: January 28, 2025 21:04 IST

पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट; १० किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन

राजकुमार जाेंधळे, लातूर : उदगीर येथील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूचे निदान झाले आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेचा याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. येथील एक किलोमीटर परिसरातील कुक्कुट पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू आहे.

उदगीर शहरातील कावळ्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेऊन शहरातली कुक्कुट पक्ष्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी रामनगर येथील कुक्कुट पक्ष्यांचा बर्ड फ्ल्यू विषयक तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रादुर्भाव क्षेत्राच्या एक किलोमीटरच्या परिसरातील देशी आणि व्यावसायिक पक्ष्यांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अंडी, खाद्यपदार्थ आणि पक्ष्यांचे सर्व अवशेषही नष्ट केले जात आहेत.

नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार...

बर्ड फ्ल्यूचा फैलाव रोखण्यासाठी प्रादुर्भाव क्षेत्राभोवती १० किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या झोनमध्ये नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या परीसरात निर्जंतुकीकरण करण्यासोबतच परिसरात कुक्कुट पक्ष्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहेत.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू