शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चाकूरातील राष्ट्रीय महामार्गाची चाळण; खड्ड्यांमुळे अपघात वाढले, धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले

By संदीप शिंदे | Updated: August 22, 2023 13:27 IST

चाकूर ते लातूररोड दरम्यान आणि चाकूर ते शासकीय विश्रामगृह या मार्गावर वाहने चालविणे तारेवरची कसरत झाली आहे.

चाकूर : तालुक्यातून रत्नागिरी-नागपूर महामार्ग जात असून, काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, लातूररोड पासून चाकूर शहर ते अलगरवाडी फाटापर्यंत रस्त्याची चाळणी झाली आहे. अनेकदा खड्डे बुजविण्यात आले असले तरी निष्कृष्ट कामामुळे परत खड्डे पडत आहेत. त्यातच धुळीचा त्रास वाढल्याने वाहनचालक, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

चाकूर ते लातूररोड दरम्यान आणि चाकूर ते शासकीय विश्रामगृह या मार्गावर वाहने चालविणे तारेवरची कसरत झाली आहे. विश्रामगृह, जूने बसस्थानक, शहरानजिकचे पूल, पुढे पेट्रोल पंप, न्यायालय, तहसील येथील बसस्थानक तर विश्वशांतीधाम मंदीर, चाकूर ते अलगरवाडी फाटा या भागातही रस्त्याची अवस्था दयनिय झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर लाखों रूपयाची उधळपट्टी झाली. मात्र, रस्ते मात्र दुरुस्त झालेच नाहीत. या रस्त्यावर हॉट मिक्सचे काम करण्यासाठी निविदा काढून कोटीचे उधळपट्टी झाली तरी रस्ता जैसे थे आहे.

शहरानजिक ओद्योगिक वसाहतीचे दोन रस्ते आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेल्याने या भागातून जाणारी वाहने औद्योगिक वसाहतीतील रस्त्याचा वापर करत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक वाहने या रस्त्यावर धावू लागली आहेत. त्यामुळे हाही रस्ता खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने दुरुस्तीची मागणी आहे.

मर्यादेपेक्षा जास्त धुळीचे प्रमाण...या रस्त्यावर धूळीचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे दमा, खोकला, ॲलर्जी यासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रवास करताना धुळीपासून संरक्षण होईल. याची काळजी प्रवासी वर्गाने घ्यावी. - डॉ. दीपक लांडे, वैद्यकिय अधीक्षक

एमआयडीसीचा रस्ता खराब होतोय...औद्योगिक वसाहतीचा रस्ता हा वाहतुकीसाठी नाही. तो फक्त वसाहतीतील उद्योजकांसाठी आहे. सध्या वहसातीतील रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. जड वाहने, वाळूची टिपर भरधाव वेगात धावत आहेत. त्यामुळे नव्याने केलेला रस्ता खराब होत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी आमच्याकडे निधी नाही. - करिमसाब शेख, चेअरमन औद्योगिक वसाहत

रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात वाढले...वाहनांचा आम्ही रोड टॅक्स भरुनही रस्ते व्यवस्थित नाहीत. राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था दयनिय झाली आहे. दुरुस्तीसाठी संबंधित विभागाचे लक्ष नाही. परिणामी, आम्हाला या खराब रस्त्यामुळे वाहनाचे मेंन्टनस मोठ्या प्रमाणावर करावे लागते शिवाय अपघात वाढले आहेत. - प्रविण मुंडे, चालक

महामार्ग प्राधिकरणाला सुचना करणार...लातूररोड ते चाकूरमार्गे आलगरवाडी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडली आहेत. धुळ मोठ्या प्रमाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुचना देऊन या समस्या सोडविण्यात येतील. अन्यथा कायदेशीर कारवाई करणार आहे. - रेणुकादास देवणीकर, तहसीलदार

टॅग्स :laturलातूरPotholeखड्डेhighwayमहामार्ग