शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा धरणात पाण्याचा ‘पॉझिटिव्ह’ साठा; उन्हाळ्यात शेतीची तहान भागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:50 IST

विशेष म्हणजे उन्हाळी पिकांसाठी पाणी पाळ्यांचे नियोजन करण्यात आले असून, कालवा समितीच्या बैठकीत यावर अंतिम मोहोर उमटणार आहे.

लातूर : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच लातूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या मांजरा धरणातून (धनेगाव) दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रकल्पात सध्या १०९ दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून, त्यापैकी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांसाठी ७८ दलघमी पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. विशेष म्हणजे उन्हाळी पिकांसाठी पाणी पाळ्यांचे नियोजन करण्यात आले असून, कालवा समितीच्या बैठकीत यावर अंतिम मोहोर उमटणार आहे.

पाटबंधारे विभागाने उन्हाळ्याची गरज लक्षात घेऊन ७८ दलघमी पाण्याचा आराखडा तयार केला आहे. दोन पाळ्या पाणी सोडले जाईल. डाव्या आणि उजव्या कालव्यातून एक रोटेशन प्रत्येकी १० दलघमीचे असेल. दोन्ही कालवे मिळून २० दलघमी पाणी शेतीसाठी एका रोटेशनमध्ये सोडले जाणार आहे.

७८ दलघमी पाण्याचा आराखडा तयार..!शेतीसाठी (कालवे) : डाव्या आणि उजव्या कालव्यातून ४० दलघमी पाणी सोडले जाईल.नदीपात्रातील बॅरेजेस : नदीपात्रातून १८ दलघमी पाणी बॅरेजेससाठी प्रवाहित केले जाईल.बाष्पीभवन व उपसा : वाढत्या उन्हामुळे होणारे बाष्पीभवन आणि उपसा यासाठी २० दलघमी पाणी गृहीत धरण्यात आले आहे.

३००० हेक्टरवरील पिकांना मिळणार जीवदान..!रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी कमी होती, त्यामुळे केवळ एकच पाळी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, उन्हाळी पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठी मागणी नोंदवली आहे.मांजरा प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांतर्गत १२०० लाभार्थी शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली आहे.या नियोजनामुळे सुमारे ३००० हेक्टरवरील उन्हाळी पिकांना पाणी मिळणार आहे.उन्हाळी पिकांसाठीचे पहिले रोटेशन पूर्ण झाले असून, उर्वरित दोन रोटेशन एप्रिल आणि मे महिन्यात पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

कालवा समितीच्या निर्णयाकडे लक्ष..!प्रशासनाने आपले नियोजन तयार केले असले तरी, या प्रस्तावावर कालवा समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे लातूर शहराचा पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील शेती या दोन्ही आघाड्यांवर दिलासा मिळण्याची शक्यता आहे.एकूण जिवंत साठा : १०९ दलघमीनियोजित वापर : ७८ दलघमीलाभार्थी शेतकरी : ११०० ते १२००सिंचन क्षेत्र : ३००० हेक्टर

English
हिंदी सारांश
Web Title : Manjara Dam's water stock ensures summer irrigation for Latur farmers.

Web Summary : Manjara Dam provides relief to Latur with sufficient water for summer crops. Irrigation Department plans water release for April-May, benefiting 3000 hectares. Canal committee's decision is awaited.
टॅग्स :Manjara Damमांजरा धरणFarmerशेतकरी