शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

बाजार समितीच्या आखाड्यात उतरले राजकीय दिग्गज; १ हजार २४८ उमेदवार निवडणूक रिंगणात

By संदीप शिंदे | Updated: April 4, 2023 14:51 IST

लातूर जिल्ह्यात दहा बाजार समित्यांमध्ये १८ संचालकांसाठी निवडणूक होत आहे

लातूर : जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, शेवटच्या दिवशी १ हजार २४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बाजार समितीच्या राजकीय आखाड्यात अनेक दिग्गजांनीही दंड थोपटले असल्याने ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची होणार आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बाजार समितींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. शिरूर अनंतपाळ वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये निवडणूक सुरू आहे. अर्ज भरण्यास २७ मार्चपासून सुरुवात झाली होती. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून अर्ज नेण्यास पसंती होती. मात्र, अर्ज भरण्याची शेवटची तारीख सोमवारची असल्याने तालुकानिहाय उपनिबंधक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी पाहावयास मिळाली.

दहा बाजार समित्यांमध्ये १८ संचालकांसाठी निवडणूक होत असून, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी लातूर बाजार समितीसाठी १७०, उदगीर २०४, देवणी ८५, चाकूर ११७, निलंगा ११२, औराद शहाजानी ११९, रेणापूर १०७, जळकोट ७०, औसा १६४ तर अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १०० असे एकूण दहा बाजार समित्यांसाठी १ हजार २४८ अर्ज दाखल झाले आहेत.

बुधवारी अर्जांची होणार छाननी...दहाही बाजार समिन्यांमधील उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार, ५ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. तसेच ६ एप्रिल रोजी वैध नामनिर्देशनपत्रांची सूची प्रसिद्ध करण्यात येईल. ६ ते २० एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर २१ एप्रिल रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच लातूर, औसा, उदगीर, चाकूर या बाजार समित्यांसाठी २८ आणि औराद शहाजानी, निलंगा, देवणी, जळकोट, अहमदपूर, रेणापूर बाजार समितीसाठी ३० रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान होणार असून, त्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे.

२२ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क...बाजार समिती निवडणुकीसाठी २२ हजार १८८ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यामध्ये लातूर बाजार समितीसाठी ५९८२, औसा २७१९, उदगीर ३३७५, चाकूर १४६९, औराद शहाजानी १२७६, निलंगा १७३७, देवणी ९४७, जळकोट १०८९, अहमदपूर २१७५ तर रेणापूर बाजार समितीसाठी १४१९ जण मतदान करतील. दरम्यान, १८ संचालकांमध्ये सहकारी संस्था मतदारसंघातून सर्वसाधारण ७, महिला २, इमाव १, भटक्या विमुक्त जाती १, ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण २, अनुसूचित जाती-जमाती १, आर्थिक दुर्बल घटक १, व्यापारी मतदारसंघातून २, हमाल व तोलारी मतदारसंघातून एक संचालक निवडण्यात येणार आहे.

टॅग्स :laturलातूरMarket Yardमार्केट यार्डElectionनिवडणूक