४८९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:22 AM2021-01-16T04:22:52+5:302021-01-16T04:22:52+5:30

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या १९५ जागांसाठी एकूण ४८९ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी संथगतीने मतदान सुुरू होते. दुपारी १२ वा.नंतर मुंबई, ...

Political future of 489 candidates sealed in voting machine | ४८९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात सील

४८९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात सील

Next

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या १९५ जागांसाठी एकूण ४८९ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी संथगतीने मतदान सुुरू होते. दुपारी १२ वा.नंतर मुंबई, पुणे, हैदराबाद, निजामाबाद, औरंगाबाद येथून मतदार वाहनांंतून येत असल्याने मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी, नायब तहसीलदार राजाराम खरात हे मतदान केंद्रावरील प्रत्येक तासाला माहिती घेत होते. उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी हे दूरध्वनीवरून तालुक्यातील मतदान केंद्रांंची माहिती घेत होते. मतदान केंद्रांंवर अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह मतदान केंद्रांंवर भेटी देऊन पाहणी करीत होते.

दोन दिवस पोलिसांचा पहारा...

तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती मतदानासाठी उत्साहात येत होत्या. कोरोनामुळे मतदारांना मास्क घातल्याशिवाय मतदान केंद्रांंवर प्रवेश दिला जात नव्हता. प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझरचा वापर केला गेला.

तालुक्यातील घोणसी, वांजरवाडा, धामणगाव, रावणकोळा, सोनवळा, बेळसांगवी, कुणकी या गावांतील ग्रामपंचायतींवर तालुक्याचे लक्ष असून येथील लढती चुरशीच्या झाल्या आहेत.

सायंकाळी ५.३० वा.नंतर मतदान यंत्रे सील करून पोलीस बंदोबस्तात तहसील कार्यालयात आणण्यात आले. मतपेट्यांवर दोन दिवस पोलीस बंदोबस्तात करडी नजर राहणार आहे. सोमवारी तहसील परिसरात नागरिकांनी गर्दी न करता उमेदवार व त्यांचे एजंट उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

उमेदवारांची धाकधूक वाढली...

सोमवारी सकाळी १० वा. पोलीस बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे. तालुक्यात अनेक मतदान केंद्रांवर क्राॅसिंग मतदान झाल्यामुळे कोण विजयी होणार, हे मतमोजणीनंतर समजणार आहे. त्यामुळे तीन दिवस उमेदवारांना विचार करीत रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. तालुक्यात एकूण मतदारांची संख्या ३१ हजार ३९६ असून त्यात १६ हजार ६४८ पुरुष तर महिला १४ हजार ७४८ आहेत. त्यापैकी एकूण दोन हजार ३४४ मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी ८२.७२ टक्के अशी आहे.

Web Title: Political future of 489 candidates sealed in voting machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.