...
विळेगाव शिवारातील अवैध दारूवर छापा
अंधोरी : अहमदपूर तालुक्यातील विळेगाव शिवारात अवैधरीत्या दारूविक्री होत असल्याची माहिती किनगाव पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. यात ३ हजार ८४० रुपयांची दारू आढळून आली. या प्रकरणी तांबटसांगवी येथील आरोपीविरुद्ध पो.कॉ. नागनाथ कातळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.हे.कॉ. मुरकुटे हे करीत आहेत.
...
जुगारावर धाड, दोघांवर गुन्हा दाखल
अंधोरी : अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून किनगाव पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. या वेळी जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम असा एकूण ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पो.हे.कॉ. रामचंद्र गोखरे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ना.पो.कॉ. देवळे करीत आहेत.