पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील डोंगरगाव शिवारात अवैध देशी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून शिरूर अनंतपाळ पोलिसांनी शुक्रवारी सापळा रचून अचानक धाड टाकली. तेव्हा देशी दारूच्या १ हजार २८ बाटल्या (किंमत ४८ हजार १८०), दोन कार, दोन दुचाकी (किंमत ३ लाख ४० हजार) असा एकूण ३ लाख ८८ हजार १८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत पोहेकाॅ. मारोती कच्छवे यांच्या फिर्यादीवरून संतोष शिंदे, बलवान कांबळे, संतोष गंगणे, भीमराव काळे, राहुल गोडसेलवार, नरसिंग समदरले, संतोष समदरले, समाधान कांबळे, बिरूदेव काळे, सतीश शिंदे, सोमेश बच्चेवार या अकरा जणांविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकाॅ. कच्छवे करीत आहेत.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा...
आरीमोड - शिरूर अनंतपाळ रस्त्यावर आनंदवाडी पाटीजवळ अवैध वाळू वाहतूक केेली जात असल्याचे निदर्शनास येताच पोलीस पथकाने अचानक छापा टाकून ट्रॅक्टरसह वाळू जप्त केली आहे. वाळूची किंमत ५ हजार आणि ट्रॅक्टरची किंमत ५ लाख आहे. या प्रकरणी बब्रुवान तपघाले यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी अल्लाउद्दीन शेख आणि बाळू ऊर्फ मिथुन किडिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोहेकाॅ. पाटील करीत आहेत.