शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पाेलिस पथकाचा छापा; १५ जुगाऱ्यांना पकडले

By राजकुमार जोंधळे | Updated: November 27, 2023 23:41 IST

११ दुचाकींसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर : जिल्ह्यातील टाका (ता. औसा) शिवारात सुरू असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साेमवारी रात्री छापा मारून १५ जुगाऱ्यांना पकडले. यावेळी एकूण ११ दुचाकींसह जुगाराचे साहित्य, राेख रक्कम असा एकूण ५ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले की, औसा तालुक्यातील बेलकुंड साखर कारखाना ते गुळखेडा मार्गावर टाका शिवारात एका शेतात जुगार सुरू असल्याची माहिती खबऱ्याने लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांना दिली. या माहितीची खातरजमा करून या जुगारावर छापा मारण्याचे आदेश दिले. पाेलिसांनी रात्रीची वेळ असल्याने घटनास्थळाचा शाेध घेत अचानकपणे टाका शिवारात एका शेतात सुरू असलेल्या जुगारावर छापा मारला.

यावेळी १५ जुगाऱ्यांना पकडण्यात पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून ११ दुचाकी, जुगाराचे साहित्य आणि राेख रक्कम १३ हजार ५०० रुपये असा ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यातील १५ जुगाऱ्यांविराेधात भादा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही स्थागुशाचे कारवाई पाेहकाॅ. राहुल साेनकांबळे, नितीन कटारे, मनाेज खाेसे, राहुल कांबळे, चालक पाेकाॅ. प्रदीप चाेपणे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी