शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात पाेलिसांकडून नाकाबंदी, काेम्बिंग ऑपरेशन, लाॅजचीही तपासणी, रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचा घेतला शाेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 05:30 IST

Latur News: सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर पाेलिसांनी शनिवारी रात्री लातूरसह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी केली. शिवाय, रेकाॅर्डवरील गुन्हेगारांच्या शाेधासाठी काेम्बिंग ऑपरेशन राबविले.

लातूर - सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर पाेलिसांनी शनिवारी रात्री लातूरसह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी केली. शिवाय, रेकाॅर्डवरील गुन्हेगारांच्या शाेधासाठी काेम्बिंग ऑपरेशन राबविले. दरम्यान, पाेलिसांनी लातुरातील लाॅजची तपासणी केली असून, नाकाबंदीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर एमआयडीसी पाेलिसांनी जुगारावर छापा मारला. यावेळी २० हजारांची राेकड जप्त केली असून, सहा जुगाऱ्यांविराेधात गुन्हा दाखल केला. तर २०२३ पासून फरार झालेल्या एका आराेपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पाेलिसांनी सांगितले, श्री गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पाेलिस अधीक्षक अमाेल तांबे, अप्पर पाेलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या आदेशानुसार शनिवारी रात्री २३ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत काेम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. लातुरातील एमआयडीसी, शिवाजीनगर, गांधी चाैक, विवेकानंद चाैक आणि लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्याच्या हद्दीत चाैका-चाैकात नाकाबंदी करण्यात आली. यावेळी प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. ज्यांच्याकडे लायसन्स नाही, ट्रीपल सीट आहेत, अशांवर खटले दाखल केले आहे. मद्याच्या नशेत वाहन चालविणारेही काही चालक पाेलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्यावरही पाेलिसांनी कारवाई केली आहे.

लातुरात लाॅज तपासणी; अचानक केली नाकाबंदी...काेम्बिंग ऑपरेशनदरम्यान लातुरातील लाॅजची पाेलिसांनी तपासणी केली. तर एमआयडीसी पाेलिसांनी एका जुगारावर छापा मारला. यावेळी राेख २० हजार रुपये, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात सहा जुगाऱ्यांविराेधता गुन्हा दाखल केला आहे.- समाधान चवरे, पाेलिस निरीक्षक, एमआयडीसी ठाणे, लातूर

दाेन वर्षांपासून फरार; पाेलिसांनी केली अटक...एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या दप्तरी २०२३ मध्ये नाेंद असलेल्या गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात एक आराेपी गुन्हा घडल्यापासून फरार हाेता. दरम्यान, ता पाेलिसांना सतत गुंगारा देत हाेता. काेम्बिंग ऑपरेशन दरम्यान पाेलिसांनी या फरार गुन्हेगाराची माहिती मिळाली. पाेलिसांनी त्याला रात्रीतून उचलले आहे.

उशिरापर्यंत अस्थापना सुरू; मालक, चालकांवर खटले...लातुरात रात्री उशिरार्यंत आपली दुकाने सुरु ठेवणाऱ्या मालक-चालकांविराेधात पाेलिसांनी खटले दाखल केले आहेत. शिवाय, ट्रीपल सीट फिरणाऱ्या वाहनधारकांवरही कारवाईची बडगा उगारला आहे. मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालविणेही अनेकांना महागात पडले आहे. अशावर पाेलिसांनी खटले दाखल केले आहेत, अशी माहिती गांधी चाैक ठाण्याचे पाेलिस निरीक्षक सुनील रेजितवाड म्हणाले.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी